المشاركات

अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय

  अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय  नत्र  अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते.  उपाय - १ % युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम युरिया १० लि. पाण्यात घेऊन फवारावे). स्फुरद  अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पाने हिरवट, लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते.  उपाय - १ % डाय अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी. (१०० ग्रॅम D-AP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे). पालाश अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.   उपाय - ०.५ % सल्फेट ऑफ पोटॅश ची फवारणी करावी. (५० ग्रॅम SOP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे). गंधक  अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांच्या पानांचा मुळचा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.   उपाय -  ०.२ % फेरस सल्फेट ची फवारणी करावी. (२० ग्रॅम फेरस सल्फेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)    लोह अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - शेंडयाकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो व झाडांची वाढ

मुख्य अन्नद्रव्य भाग 3 पिकांमधील पालाशच्या (पोटॅश) कमतरतेची लक्षणे व उपाय

صورة
नमस्कार मित्रांनो आधीच्या दोन भागांमध्ये नत्र आणि स्फुरद या घटकांच्या कमतरतेची लक्षणे पाहिली आता यामध्ये बघूया  पालाश च्या कमतरतेची लक्षणे व उपाय 1)  मित्रांनो पालाश म्हणजे की पोटॅश या घटकाच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या  मधल्या भागातील पानावर दिसतात त्यामध्ये पानांचा  लालसर तपकिरी रंग कडेक कडून मध्य भागाकडे शिरा पर्यंत पसरतो 2)  यामध्ये पानाच्या कडा वर लालसर तपकिरी डाग पडून कडा वाळतात व खालच्या किंवा वरच्या बाजूस वळतात 3)  द्राक्ष पिकावर उन्हाळी हंगामामध्ये घडासमोरील किंवा शेजारील पाने उन्हात असल्यास जांभळट व तपकिरी रंगाची होतात 4)  द्राक्षाच्या वेलीवर   घडांचे प्रमाण जास्त असल्यास पालाशच्या म्हणजेच पोटॅशच्या कमतरतेमुळे पानगळ सुरू होते 5)  पोटॅशची कमतरता जास्त प्रमाणात असल्यास  घड लहान व घट्ट राहून  मनी एकावेळी पिकत नाहीत 6)  द्राक्षाचे नवीन पाने पिवळसर होऊन कडेच्या बाजूस नेक्रोटिक  ठिपके दिसतात 7)  पोटॅशच्या कमतरतेमुळे  घडाची वाढ व मण्यांची  पीकण्याची अर्थात पाणी उतरण्याची प्रक्रिया मंदावते  खाली दिलेल्या काही कारणांमुळे पोटॅश या अन्नद्रव्याची कमतरता आढळते 1)  जमिनीमध्ये पाण्याचा प्रमा

मुख्य अन्नद्रव्य भाग 2 पिकांमधील स्फुरदाच्या कमतरतेची लक्षणे व उपाय

صورة
  नमस्कार मित्रांनो आधीच्या पोस्टमध्ये आपण नत्राच्या कमतरतेची लक्षणे बघितली आता या पोस्टमध्ये आपण स्फुरद या घटकाच्या कमतरतेची लक्षणे पाहणार आहोत स्फुरद म्हणजे ज्याला आपण सुपर फॉस्फेट म्हणतो 1) स्फुरदाच्या कमतरतेमुळे वेलीच्या शेंड्याची व मुळांची वाढ खुंटते 2) याचबरोबर पानाचे देट व कडाही लालसर होतात 3) वेलवर्गीय पिकांमध्ये पाणी लहान राहतात व त्यावर लाल रंगाचे डाग दिसतात 4) पानांच्या शिरा काही प्रमाणात निळसर दिसतात तर पानांच्या कडा खालच्या बाजूस वळतात 5) याचबरोबर फळ धारणेचे प्रमाण देखील घटते मित्रांनो खालील प्रकारच्या जमिनीत स्फुरदाची कमतरता जास्त प्रमाणात आढळते 1) ज्या जमिनीमध्ये चुनखडीचे प्रमाण आढळते ( चुनखडीयुक्त जमीन ) 2) जास्त काळ पाणी साचून राहणारी जमीन खाली दिलेल्या काही कारणांमुळे स्फुरदाची कमतरता आढळून येते 1) जमिनीमध्ये जास्त काळ ओलावा राहणे 2) कॅल्शियम बरोबर क्रिया होऊन कॅल्शियम फॉस्फेट तयार होते त्यामुळे वेलींना स्फुरद घेता येत नाही 3 ) कमी तापमानामुळे वेलींना स्फुरद घटक घेता येत नाही मित्रांनो स्फुरदाची कमतरता आढळून आल्यास करण्यासाठी खाली दिलेले काही उपाययो

मुख्य अन्नद्रव्य भाग 1 पिकावरील नत्र कमतरतेची लक्षणे तसेच उपाय

صورة
  पिकावरील नत्र कमतरतेची लक्षणे तसेच उपाय 1) फुटीच्या तळाकडील पाणी अगोदर पिवळी होतात व नंतर शेंड्याकडील पाने पिवळी पडू लागतात 2) वेलवर्गीय पिकाची वाढ कमी प्रमाणात होते 3) पानांचा रंग एक सारखा प्रथम फिकट व नंतर पिवळा होतो 4) नत्राची कमतरता जास्त असल्यास पाने लालसर किंवा भूरकट होऊन गळू लागतात 5) नत्राच्या कमतरतेमुळे नवीन फुट, डेट आणि फुटीच्या खोडाचा कुंज का पिंक किंवा लाल रंगाचा होतो 6) नत्राच्या कमतरतेमुळे पाणी कमी प्रमाणात असणाऱ्या भागात पानाच्या कडा वरील बाजूस वळतात व नंतर वाळून जातात 7) जमिनीचा चांगल्या प्रमाणात निचरा नसेल तर वेलवर्गीय पिकाच्या पानांवर पिवळसर रंगाची छटा निर्माण होते   खाली दिलेल्या प्रकारच्या जमिनीत नत्राची कमतरता जास्त प्रमाणात आढळून येते 1) वाळूचे प्रमाण असणाऱ्या जमिनीत व भरपूर पाणी साचणाऱ्या असणाऱ्या जमिनीत जमिनीत 2) सेंद्रिय पदार्थ कमी असणाऱ्या जमिनीत देखील नत्राची कमतरता भासते नत्राची कमतरता दूर करण्यासाठी खालील उपाय योजना कराव्यात ( सर्वप्रथम माती परीक्षण करून घ्यावे) 1 नत्राचे प्रमाण असणाऱ्या खतांचा वापर जमिनीतून किंवा फवारणीद्वारे करावा 2 शेणखत तस

किटकनाषकांचे लेबल व त्यांच्या क्लेमबाबत शेतकर्याचे अधिकार व सर्व माहिती

صورة
किटकनाषकांचे लेबल म्हणजे काय व त्यांच्या क्लेमबाबत सर्व माहिती                     शेतकरी मित्रांनो  आपण आपल्या शेतामध्ये किटकणाषके , बुरशीनाषके किंवा तननाषके यांचा वापर करतो. याचा कधी कधी पिकावर चांगला परिणाम होत नाही मग बर्‍याचदा आपण दुकानदार किंवा त्या कंपनीला दोष देतो यामध्ये आपले जे नुकसान व्हायचे ते तर होते. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे अधिकार व आपण कोणत्या प्रकारचे म्हणजेच शासनाने प्रमाणित केलेले किटकणाषके वापरत आहोत किंवा कुठल्या बोगस कंपनीच्या औषधाचा तर वापर करत नाहीतणा याबद्दल जागरूक होणे हि काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो जाणून घ्या      शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम खरेदी करतांना शासनाने ज्या कृषि सेवा केंद्रास अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी परवाना दिलेला आहे अश्याच केंद्रातून खरेदी करावी व पक्के बिल घ्यावे. शासनाने अशा दुकानास गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकर्‍यांच्या सुविधे साठी अधिकृत किटकणाषके  बियाणे व खते विक्रीसाठी ( निविष्टा ) परवाना दिलेला असतो. व शासकीय अधिकारी वेळोवेळी दुकानातील किटकणाषके बियाणे व खते यांची गुणवत्ता म्हणजेच सॅम्पल ची वेळोवेळी तपास

Ginger Farming Full Information

صورة
  Ginger  आले ( अद्रक )                         Medium quality, well-drained and well drained soil is suitable for cultivation of this crop. The alluvial soil along the river is suitable for growing tubers. If you want to cultivate ginger in light soil, you should use a lot of manure, compost or green manure so that the yield of ginger is good. Depth of soil to a pan, which impedes rooting. I Should be   Ginger  आले ( अद्रक ) Ginger Fertilizer Management  Ginger requires less than 16 nutrients in total. Therefore, when using fertilizers, use balanced and adequate amount of fertilizers. While preparing the land for ginger cultivation, apply 120 kg N (urea), 75 kg potash and 75 kg P (super phosphate) per hectare at the time of planting. Apply half dose of Nitrogen (Urea) fertilizer about 1 month after completion of germination. The remaining half of N should be given after 2.5 to 3 months (at the time of extraction). At that time 1.5 to 2 tons of neem powder should be given. Ginger culti

हरभरा लागवड | हरभरा उत्पादन वाढीसाठी महत्वाच्या बाबी | हरभरा सुधारित वान | हरभरा पिकातील कीड व रोग | हरभरा लागवडी साठी जमीन | काबुली हरभर्‍याच्या सुधारित जाती

صورة
हरभरा पिकाबद्दल थोडक्यात                            हरभरा हे रब्बी हंगामात घेतल्या जाणार्‍या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसेच मानवी आहारात हरभर्‍याचे खूप महत्व आहे. नवीन सुधारित वानांचा विचार केला असता प्रगतिशील शेतकर्‍यांच्या शेतामधील सुधारित वनांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत गेल्याचा अनुभव आहे. या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण हरभर्‍यावरील घाटेअळी तसेच विविध कीड व रोग हे आहे. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणाची निवड तसेच कीड व रोगाचे चुकीचे नियोजन हे देखील उत्पादनावर परिणाम करते. हरभर्‍यावरील घाटेअळी ही ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान करते.  उत्पादन वाढीसाठी खालील बाबींचा वापर करावा style="display:block" data-ad-format="fluid" data-ad-layout-key="-gw-3+1f-3d+2z" data-ad-client="ca-pub-9904937471916771" data-ad-slot="9099651976"> १ ) पेरणीसाठी योग्य जमिनीची निवड करावी व पूर्वमशागत करून घ्यावी. २ ) वेळेवर पेरणी कराव

तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग

صورة
तूर लागवड | तूर लागवडी साठी जमीन | तुरीच्या सुधारीत जाती ( वान ) | तूर पेरणी कधी करावी | तूर बीज प्रक्रिया | तूर खत नियोजन | तुरीवरील किड व रोग तुरी बद्दल  थोडक्यात                      शेतकरी बांधवांनो भारता मध्ये  तुरीची शेती करणार्‍या राज्यामध्ये अग्रगन्य राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. तूर हे राज्यातील सर्वात प्रमुख डाळवर्गीय पीक असून याची लागवड सर्व भागामद्धे खरीप हंगामात अंतरपिक म्हणून बाजरी, कापूस, ज्वारी तसेच सोयाबीन या प्रमुख पिकांबरोबर केली जाते. तूर हेपिक डाळवर्गी असल्यामुळे यापिकाच्या मुळावरील असणार्‍या गाठीतील रायझोबियम या जिवाणूमुळे हवेतील नत्राचे फार मोठ्या प्रमाणात स्थिरीकरण होते. तसेच नत्रयूक्त रसायनिक खताची बचत देखील होते. तुरीच्या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागील कारणांमध्ये मर रोग व शेंगा पोखरणार्‍या आळीचा प्रादुर्भाव तसेच पिकाला फुले व शेंगा लागण्याच्या काळात पाण्याची कमतरता. यामुळे तुरीच्या उत्पन्नात फार मोठी घट होते. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणांची निवड तसेच कीड व रोगांबद्दल अपुरी माहिती या कारणांमुळे देखील उत्पन्नत घट होते. तूर लागवडी साठी जमीन            

कापसा वरील किड व रोग

صورة
  कापूस लागवड | कापूस  लागवडीची योग्य वेळ |  कापसा वरील किड व रोग | कापसाचे खत नियोजन | कापूस लागवडीसाठी वानांची निवड | कापसाचे भरघोस उत्पादन                     🙏  शेतकरी बांधवांनो कापूस लगवडीपासूनच जर किड व रोगाचे योग्य नियोजन केले तर कापूस हे पीक नक्कीच आर्थिक फायदा करून देणारे पीक ठरू शकते. कापसाच्या कमी उत्पादना मागे बरीच कारने आहेत. त्यामध्ये किड व रोगामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. कापसावर भारतामध्ये जवळपास १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवळपास २५ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनो कापसाच्या उत्पन्नात घट होण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे कीड व रोगा बद्दल माहिती नसणे व कीटकनाशकांच्या जास्त तसेच काही वेळा चुकीच्या फवारण्या करणे. यामुळे उत्पन्नात घट होतेच परंतु खर्च देखील वाढतो. यासाठी पिकाच्या वाढीच्या टप्यानुसार तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भावा नुसार वेळीच कीटकनाशकांची फवारणी तसेच इ. पद्धतींचा म्हणजे जैविक पद्धतीचा वापर करून वेळीच कीड व रोग व्यवस्थापन केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल. कापूस ( पांढरे सोने ) कापूस ला
المزيد من المشاركات