अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे पिकांवर दिसणारी लक्षणे व त्यावरील उपाय
नत्र
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांची खालची पाने पिवळी होतात. मुळांची व झाडांची वाढ थांबते.
उपाय - १ % युरियाची फवारणी करावी. (१०० ग्रॅम युरिया १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
स्फुरद
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पाने हिरवट, लांबट होऊन वाढ खुंटते. पानांची मागील बाजू जांभळट होते.
उपाय - १ % डाय अमोनियम फॉस्फेट ची फवारणी करावी. (१०० ग्रॅम D-AP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
पालाश
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पानांच्या कडा तांबटसर होऊन पानांवर तांबडे व पिवळे ठिपके पडतात. खोड आखूड होऊन शेंडे गळून पडतात.
उपाय - ०.५ % सल्फेट ऑफ पोटॅश ची फवारणी करावी. (५० ग्रॅम SOP १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
गंधक
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांच्या पानांचा मुळचा रंग कमी कमी होतो व नंतर पाने पूर्ण पिवळी पडतात.
उपाय - ०.२ % फेरस सल्फेट ची फवारणी करावी. (२० ग्रॅम फेरस सल्फेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
लोह
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - शेंडयाकडील पानांच्या शिरांमधील भाग पिवळा होतो व झाडांची वाढ खुंटते.
उपाय - ०.२ % चिलेटेड लोहाची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड लोह १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
जस्त
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पाने लहान होऊन शिरांमधील भाग पिवळा होतो व पाने ठिकठिकाणी वाळलेली दिसतात.
उपाय - ०.२ % चिलेटेड झिंक ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड झिंक १० लि. पाण्यात घेऊन फवारावे.
मंगल
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाने पिवळा होतो व नंतर पांढरट व करडा होतो, संपूर्ण पर्ण फिक्कट होऊन गळते. उपाय - ०.२ % चिलेटेड मंगल ची फवारणी करावी. (२० ग्रॅम चिलेटेड मंगल १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
तांबे
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांच्या शेंड्यांची वाढ खुंटते. खोडांची वाढ कमी होते, पाने गळतात.
उपाय - ०.४ % मोरचूदची फवारणी करावी. (४० ग्रॅम मोरचूद १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
बोरॉन
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - झाडांचा शेंडा व कोवळी पाने पांढरट होऊन मरतात. फुलगळ होते व फळांना तडे जातात.
उपाय - ०.२ ते ०.३ % बोरिक ऍसीड पावडरची फवारणी करावी. (२० ते ३० ग्रॅम बोरिक ऍसीड १० लि. पाण्यात घेऊन फवारावे)
मोलाब्द
अन्नद्रव्यांच्या कमतरतेची लक्षणे - पाने पिवळी होऊन त्यावर तपकिरी ठिपके पडतात, पानांच्या मागच्या बाजूने तपकिरी डिंकासारखा द्रव स्रवतो.
उपाय - ०.०१ % सोडियम। मॉलीब्डेट ची फवारणी करावी. (०.५ ते १.० ग्रॅम सोडियम मॉलीब्डेट १० लि. पाण्यात घेऊन फवारावे).
Comments
Post a Comment