दुग्धोत्पादना वाढीसाठी व गाईंच्या, म्हशींच्या आरोग्यासाठी काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी
1 ) गाईंच्या सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नयेत, यासाठी ग्लिसरीनचा वापर करावा.
2 ) सडाला भेगा पडल्यास तात्काळ उपचार करावेत.
3 ) दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
4 ) दुधाळ जनावरांना शक्यतो ज्याठिकाणी एकदम थंड वारे लागणार नाही अशा ठिकाणी ठेवावे.
दुधाळ जनावरांना कोणता संतुलित आहार द्यावा.
त्यामध्ये एकदल व द्विदल हिरवा चारा, कोरडा चारा, शरीर पोषणासाठी आवश्यक व दुग्धोत्पादनासाठी अतिरिक्त पशुखाद्य, खनिज मिश्रण व मीठ यांचा वापर करावा. जेणे करून दुग्धोत्पादन वाढण्यास मदत होईल.
Tags: पशुंवर्धन