आवश्यक अन्नद्रव्ये म्हणजे काय
काही छोट्या पण महत्वाच्या गोष्टी ज्या आपल्या शेतकरी मित्रांना माहीत असाव्या त्या म्हणजे
1 ) आवश्यक ( मुख्य ) अन्नद्रव्ये म्हणजे काय
2) सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय
ह्या दोन गोष्टी थोडक्यात.
1 ) आवश्यक ( मुख्य ) अन्नद्रव्ये म्हणजे काय :-
मित्रांनो आपण पाहिले असेल बर्याचदा पिकांची खासकरून वेलवर्गीय पिकांची वाढ चांगल्या प्रकारे होत नाही, किंवा जीवनक्रम पूर्ण होवू शकत नाही, बर्याचदा त्या मागील कारण अन्नद्रव्याची कमतरता असू शकते.
मित्रांनो ज्या अन्नद्रव्याशिवाय वेलीचा जीवनक्रम पूर्ण होवू शकत नाही व ती अन्नद्रव्य मिळताच वेलीची खुंटलेली वाढ परत सुधारते तसेच त्या अन्नद्रव्याचा वेलवाढीच्या एखाद्य कार्यात प्रत्यक्ष सहभाग असतो अशा प्रकारच्या अन्नद्रव्यांना आवश्यक अन्नद्रव्य म्हणतात
( उदा. नत्र , स्फुरद , पालश , मॅग्नेशियाम , कॅल्शियम , आणि गंधक )
2) सूक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे काय :-
ज्या प्रमाणे पिकाला मुख्य अन्नद्रव्याची आवशक्ता असते त्याच प्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्यांची सुधा पिकांना थोड्याफार प्रमाणात आवशक्ता असते.
काही अन्नघटक वेलींना अत्यंत कमी प्रमाणात लागतात. त्यांनाच सूक्ष्म अन्नद्रव्य असे म्हणतात.
( उदा. लोह , मंगल , बोरॉन , जस्त , ताम्र , मॅलिब्डेनम , आणि क्लोरिण )