किटकनाषकांचे लेबल म्हणजे काय व त्यांच्या क्लेमबाबत सर्व माहिती
शेतकरी मित्रांनो आपण आपल्या शेतामध्ये किटकणाषके , बुरशीनाषके किंवा तननाषके यांचा वापर करतो. याचा कधी कधी पिकावर चांगला परिणाम होत नाही मग बर्याचदा आपण दुकानदार किंवा त्या कंपनीला दोष देतो यामध्ये आपले जे नुकसान व्हायचे ते तर होते. म्हणूनच माझ्या शेतकरी बांधवांनी त्यांचे अधिकार व आपण कोणत्या प्रकारचे म्हणजेच शासनाने प्रमाणित केलेले किटकणाषके वापरत आहोत किंवा कुठल्या बोगस कंपनीच्या औषधाचा तर वापर करत नाहीतणा याबद्दल जागरूक होणे हि काळाची गरज आहे. म्हणून मित्रांनो जाणून घ्या
शेतकरी मित्रांनो सर्व प्रथम खरेदी करतांना शासनाने ज्या कृषि सेवा केंद्रास अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी परवाना दिलेला आहे अश्याच केंद्रातून खरेदी करावी व पक्के बिल घ्यावे. शासनाने अशा दुकानास गुणवत्ता नियंत्रण तसेच शेतकर्यांच्या सुविधे साठी अधिकृत किटकणाषके बियाणे व खते विक्रीसाठी ( निविष्टा ) परवाना दिलेला असतो. व शासकीय अधिकारी वेळोवेळी दुकानातील किटकणाषके बियाणे व खते यांची गुणवत्ता म्हणजेच सॅम्पल ची वेळोवेळी तपासणी करत असतात. यामुळे शेतकरी बांधवांना चांगले उत्पादनेच मिळतात व फसवणूक होत नाही.
लेबल क्लेम म्हणजे काय ..
शेतकरी मित्रांनो आपल्या देशामध्ये किटकणाषके या निविष्ठेची गुणवत्ता नियंत्रित करण्यासाठी किटकणाषक अधिनियम १९६८ व अधिनियम १९७१ राबविण्यात येतो. या कायद्यानुसार कोणत्याही कंपनीला किटकणाषकाचे वेष्टणीकरण केल्याशिवाय त्यांच्या किटकणाशकांची शेतकर्यांना विक्री करता येत नाही. याच बरोबर वेष्टणीकरण केल्यानंतर त्यावर केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समिती यांनी मान्य करून दिलेल्या नोंदणी प्रमाणपत्रा सोबतच्या लेबलणूसारच लेबलची छपाई करावी लागते. तसेच वेष्टनामधील किटकणाशकांचे गुणधर्म लेबलवर छपाई केलेल्या मापदंडानुसारच असणे हे या किटकणाषक कायद्याने बंधनकारक आहे. थोडक्यात सांगायचे म्हणजे कंपनीने लेबलवर छापलेल्या प्रमाणकानुसारच शतप्रतिशत क्रियाशील घटक वेष्टनामधे ( बाटली किंवा पाकीटा मध्ये असलेले औषध ) असणे म्हणजेच लेबलक्लेम.
लेबलवर काय माहिती असते ..
- उत्पादनाचे तांत्रिक नाव, त्यामध्ये असणार्या क्रियाशील घटकाचे प्रमाण, त्याच्या फॉर्म्युलेशनचा प्रकार
- उत्पादनाचा बॅच नंबर, उत्पादन तयार झाल्याची तारीख, उत्पादनाची वापरासाठी अंतिम तारीख (expiry date)
- उत्पादकाचे (निर्माता) / आयतदार / विक्रेत्याचे नाव व संपूर्ण पत्ता
- विषबाधेची तीव्रता दर्शवणारा त्रिकोण तसेच वापारतांना किंवा वापरानंतर लहान मुले व उत्पादन साठवणूकीबाबत सूचना
- रिकाम्या वेष्टनाची विल्हेवाट कशी लावावी यासंबंधीच्या सूचना (माहिती)
- सुरक्षित हाताळणी कशी करावी यासंबंधीच्या सूचना (माहिती)
- उत्पादनाची रासायनिक संरचना (घटक), त्याचे व्यापारी नाव .
- कोण कोणत्या पिकावर व कोणत्या किडी/रोगा साठी वापरासाठी चालते त्याची शिफारस.
- विषबाधा झाल्यास त्यावर अॅंटिडोट्स व त्यावरील प्रथमोपचार इत्यादी बाबत महिती.
- विक्रीसाठी किरकोळ किंमत उत्पादनाचे वजन इत्यादी.
( लेबल लहान असल्यास अनुक्रमांक आठमधील माहिती हि लीफलेट किंवा माहितीपत्रिकेच्या स्वरुपात स्वतंत्रपणे छपाई करून उत्पादनासोबत ठेवलेली असते.)
- सर्वप्रथम किटकणाषक खरेदी करत असतांना परवानाधारक विक्रेत्याकडूनच खरेदी करावी.
- विक्रेत्याकडून खरेदीचे पक्के बिल घ्यावे. बिलावर खरेदीची तारीख , उत्पादनाचे व्यापारी नाव व तांत्रिक नाव , क्रियाशील घटकाचे प्रमाण, फॉर्म्युलेशनचा प्रकार, उत्पादनाचा बॅच नंबर, उत्पादन तयार झाल्याची तारीख, उत्पादनाची वापरासाठी अंतिम तारीख (expiry date), त्याचे वजन, किंमत इत्यादी माहिती लिहिलेली असावी. लिहिलेली माहिती अचूक आहेका तसेच बिलावर विक्रेत्याची सही असल्याची खात्री करावी
- शेतकर्याला किटकणाषके ज्या कारणासाठी वापरायचे आहे. त्यासाठी संबंधित किटकणाषकाची शिफारस केलेली असल्याची लेबल लिफलेटवरुण तपासनी करून नंतर किटकणाषके खरेदी करावे.
- लेबल लिफलेटवरील पिकांच्या शिफारशीबाबतच्या माहितीची सत्यता तपासून पहायची असल्यास केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समितीच्या https://www.cibrc.gov.in किंवा येथे 👉 CLIK या संकेत स्थळावर संबंधित किटकणाषकाला लेबल क्लेमची सदरील पिकासाठी शिफारस केलेली आहे किंवा नाही याबाबत खात्री करता येते.
- खराब झालेले किंवा मुदतबाह्य (expiry) झालेले तसेच सीलबंद नसलेले किटकणाषक खरेदी करू नये.
- खरेदी करतांना किटकणाषकासोबत लेबल लीफलेट असल्याबाबत खात्री करून नंतरच किटकणाषकाची खरेदी करावी.
किटकणाषकांच्या लेबल क्लेमनुसार ग्राहकाचे अधिकार व सुरक्षितता याबद्दल थोडक्यात
- पॅकिंग केलेल्या किटकणाषकाच्या पॅकवरील लिहीलेल्या लेबलणूसारच बाटली किंवा पाकीटातील किटकणाषकाचा क्रियाशील घटक त्यामध्ये असल्याची खात्री उत्पादकाणे लेबल क्लेमनुसार दिलेली असते.
- पॅकिंग करण्यापूर्वी किटकणाषक उत्पादकाने सदर किटकणाषकाच्या उत्पादनाच्या गुणवत्तेबाबत स्वतःच्या प्रयोगशाळेत प्रत्येक बॅचची तपासणी करून घटकाच्या मात्रेची खात्री केलेली असते.
- केंद्रीय किटकणाषक मंडळ व नोंदणी समितीने संबंधित कंपनीकडून तयार केलेल्या उत्पादनाची (औषधीमधील विषाचे प्रमाण किंवा तीव्रता ) विषकारकता, पिकानुसार पिकावरील कीड व रोग यांच्या नियंत्रणाबाबत त्याची परिणामकारकता. तसेच कामगार, ग्राहक व पर्यावरणासाठीची सुरक्षितता, उत्पादनाचे रसायनशास्त्र इत्यादि गोष्टींचा विस्तृत व अभ्यासपूर्वक ( माहिती घेवून) आकडेवारी घेऊन त्याची तपासणी करून खात्री केलेली असते.
- कंपनीला नोंदणी प्रमाणपत्र देताना मानवी आरोग्य व पर्यावरणाची सुरक्षितता या गोष्टींना पहिले प्राधान्य दिलेले असते. त्यामुळे नोंदणी प्रमाणपत्रानुसार लेबल क्लेम सादर केलेल्या कंपनीचे उत्पादन सर्वथा सुरक्षित असते.
- कंपनीच्या नोंदणी प्रमाणपत्रासोबत वेष्टणीकरणानंतर त्यावर छपाई करून त्यावर प्रदर्शित करावयाचे लेबल व लीफलेटचा मसुदा अंतिम करून दिलेला असतो. त्यामुळे नोंदणी समितीच्या परवानगीशिवाय कोणत्याही कंपनीला त्यामाध्ये बदल करता येत नाही.
- ग्राहकांच्या सोईसाठी लेबल व माहीतीपत्रक इंग्रजी, हिंदी या भाषांसोबत मराठी भाषेतही छापणे उत्पादकास (कंपनीस) बंधनकारक आहे.
तक्रार कोठी करावी?
किटकणाषकाच्या पिकावरील परिणामकारकतेबाबत काही तक्रार असल्यास अशी लेखी तक्रार संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समितीचे कृषि अधिकारी यांच्याकडे दाखल करता येते. तक्रार दाखल करताना संबंधित उत्पादनाचे वेष्टन, लेबल, माहितीपत्र, खरेदीपावती इत्यादि बाबी तालुका कृषि अधिकारी यांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्रत्येक तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे अधिनस्त शासनाने तालुका तक्रार निवारण समिति गठित केलेली असून सदर समितीमध्ये विक्रेता, कृषि विद्यापीठ, महाबीज, कृषि विज्ञान केंद्र यांचे प्रतीनिधी सदस्य म्हणून असतात. सदर समिति आठ दिवसांमध्ये संबंधित शेतकर्याच्या शेताला भेट देऊन आपला अहवाल उपलब्ध करून देते. सदर अहवाल ग्राहक न्यायालयात पुरावा म्हणून सादर करता येतो. खालील प्रकारच्या तक्रारींसाठी नजदिकच्या तालुका कृषि अधिकारी/ जिल्हा/ उपविभाग/ संभाग, कृषि कार्यालयाशी किंवा किटकणाषक गुणवत्ता निरीक्षण यांच्याशी संपर्क साधावा.
- लेबल किंवा माहितीपत्रकावर खाडाखोड झालेली आढळली.
- लेबल व लीफलेट सुस्पष्ट व वाचनीय नाहीत म्हणजे वाचता येत नाही.
- इंग्रजी व हिंदी भाषेबरोबरच मराठी भाषेत लीफलेट वर छपाई केली नाही.
- उत्पादकाने संबंधित किटकणाषक जास्तीच्या पिकासाठी शिफारस केली असल्याचे लीफलेटवर माहिती नमूद केलेली असल्याचा संशय असल्यास.
- उत्पादनाच्या लेबलवर उत्पादनाच्या स्थळाचा उल्लेख केलेला नाही असे दिसून आल्यास.
आशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधित उत्पादकांवर किटकणाषक अधिनियम १९६८ व नियम १९७१ मधील तरतुदींनुसार कारवाई करता येते.