हरभरा पिकाबद्दल थोडक्यात
हरभरा हे रब्बी हंगामात घेतल्या जाणार्या पिकांपैकी एक महत्वाचे कडधान्य पीक आहे. राज्यात या पिकाच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येते. तसेच मानवी आहारात हरभर्याचे खूप महत्व आहे. नवीन सुधारित वानांचा विचार केला असता प्रगतिशील शेतकर्यांच्या शेतामधील सुधारित वनांचे उत्पादन हेक्टरी ३० ते ३५ क्विंटलपर्यंत गेल्याचा अनुभव आहे. या पिकाचे उत्पादन कमी होण्यामागे कारण हरभर्यावरील घाटेअळी तसेच विविध कीड व रोग हे आहे. याच बरोबर लागवडीसाठी चुकीच्या वाणाची निवड तसेच कीड व रोगाचे चुकीचे नियोजन हे देखील उत्पादनावर परिणाम करते. हरभर्यावरील घाटेअळी ही ३० ते ४० टक्के पिकाचे नुकसान करते.
उत्पादन वाढीसाठी खालील बाबींचा वापर करावा
१ ) पेरणीसाठी योग्य जमिनीची निवड करावी व पूर्वमशागत करून घ्यावी.
२ ) वेळेवर पेरणी करावी तसेच पेरणीचे योग्य अंतर ठेवावे.
३ ) पेरणी करतांना बिजप्रक्रिया करावी तसेच जिवाणू संवर्धंनाचा वापर करावा.
४ ) पेरणीसाठी अधिक उत्पादन देणार्य तसेच रोग प्रतीकारक्षम व सुधारित वानाची निवड करावी.
५ ) रोग व किडींचे योग्य नियोजन करावे तसेच तननियंत्रण करावे.
६ ) खत आणि पाण्याचे देखील योग्य नियोजन करावे.
हरभरा लागवडी साठी जमीन
हरभरा पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी मध्यम ते भारी काळी कसदार, भुसभुशीत तसेच पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. ज्या भागामद्धे वार्षिक चांगले पर्जन्यमान होते अश्या भागामद्धे मध्यम ते भारी जमिनीत रब्बी हंगामात ओलावा चांगला टिकून राहतो अश्या भागामद्धे जिरायत हरभर्याचे चांगले पीक येते. ज्या ठिकाणी सिंचन व्यवस्था असेल अश्या ठिकाणी उथळ तसेच मध्य जमिनीत देखील हरभर्याचे पीक घेता येते. हरभरा पिकाच्या लागवडी साठी हलकी चोपण किंवा पाणथळ व क्षारयूक्त जमिनीची निवड करूनये.
हरभर्याच्या सुधारित जाती व त्यांचे वैशीष्टे ( वान )
१ ) फुले विक्रम
फुले विक्रम या वनाच्या दाण्याचा आकार पिवळसर मध्यम असून हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या झाडाची ऊंची ५५ ते ६० सेंमी असून घाटे हे जमिनीपासून १ फुटावर लागतात. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. याच बरोबर अधिक उत्पन्न देखील देणारा हा वान आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १६ ते १७ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात २२ ते २३ प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास २१ ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते. हा वान साधारण २ फुटापर्यंत वाढत असल्यामुळे हार्वेस्टर्णे काढणी करण्यास योग्य आहे. त्यामुळे काढणी खर्च तसेच काढणी करतांना होणारे नुकसान हे देखील होत नाही. ( महात्मा फुले कृषि विद्यापीठाने हार्वेस्टर्णे काढणी करता येईल अश्या फुले विक्रम या हरभर्याच्या सुधारीत वानाची निर्मिती केली आहे. )
२ ) दिग्विजय
दिग्विजय हा वान पिवळसर तांबूस रंगाचा असून या वाणाचे दाणे टपोरे असतात. हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या झाडाची ऊंची मध्यम असून वाढीचा कल निमपसरट व पाने , घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण जिरायत क्षेत्रामद्धे ९० ते ९५ दिवस तर बागायत क्षेत्रात साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १५ ते १६ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १८ ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
३ ) विजय
विजय हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून अधिक उत्पादनक्षम आहे. या वाणाची पाण्याचा तान सहन करण्याची क्षमता ही ईतर वानांन पेक्षा जास्त आहे. हा वान जिरात, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. हा वान बुटका तसेच पसरट असून पाने, घाटे व दाणे आकाराने मध्यम आहे. या वाणाची पक्वता साधारण जिरायत क्षेत्रामद्धे ८५ ते ९० दिवस तर बागायत क्षेत्रात साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १६ ते १८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
४ ) जाकी ९२१८
जाकी ९२१८ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे पिवळसर तांबूस तसेच आकाराने टपोरे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १५ ते १६ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २८ ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
५ ) विशाल
विशाल हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून यामध्ये प्रथिनांचे प्रमाण अधिक आहे. या वानाचे दाणे आकर्षक पिवळ्या रंगाचे तसेच टपोरे असतात. हा वान अधिक उत्पादनक्षम असून या वानाला बाजारभाव देखील अधिक मिळतो. या वानाच्या झाडाची ऊंची मध्यम असून वाढीचा कल निमपसरट व पाने , घाटे आकाराने मोठे तसेच गर्द हिरवे असतात. हा वान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३५ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
६ ) साकी ९५१६
साकी ९५१६ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे मध्यम आकाराचे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
७ ) बी. डी. एन. जी. ७९७
बी. डी. एन. जी. ७९७ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वाणाचे दाणे मध्यम टपोर्या आकाराचे असून हावान जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २० ते २२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
८ ) फुले जी - १२
फुले जी - १२ या वानाचा रंग आकर्षक पिवळसर तांबूस असून हा वाणा जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य आहे. या वानापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १२ ते १३ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात २८ ते ३० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
९ ) राजस
राजस हा वान पिवळसर तांबूस रंगाचा असून या वाणाचे दाणे टपोरे असतात. हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीसाठी योग्य आहे. या वाणाची पक्वता साधारण १०० ते १०५ दिवस ईतकी आहे. या वाणापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १४ ते १५ क्विंटल प्रती हेक्टरी, बागायत क्षेत्रात ३५ ते ४० क्विंटल प्रती हेक्टरी तर उशिरा पेर केल्यास १८ ते २० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
१० ) आय सी सी सी ३७
आय सी सी सी ३७ हा लवकर येणारा तसेच मर रोगास प्रतिकारक्षम वान आहे. तसेच हावान घाटे अळीस सहनशील आहे. या वाणाची पक्वता साधारण ९० ते १०० दिवस ईतकी आहे. या वानापासून साधारण उत्पन्न १६ ते २० क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
काबुली हरभर्याच्या सुधारित जाती व त्यांचे वैशीष्टे ( वान )
१ ) विराट
विराट हा वान मर रोगास प्रतिकारक्षम असून हा वान काबुली तसेच अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे यास अधिक बाजारभाव मिळतो. हा वाण जिरायात तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १० ते १२ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते.
२ ) विहार
विहार हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान देखील अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे यास चांगला बाजारभाव मिळतो. हा वाणा जिरायत तसेच बागायत क्षेत्रात पेरणीस योग्य. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून जिरायत क्षेत्रात साधारण उत्पन्न १० ते १२ क्विंटल प्रती हेक्टरी तर बागायत क्षेत्रात ३० ते ३२ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके उत्पन्न मिळू शकते. दक्षिण भारतात या वानाची पक्वता ९० ते ९५ दिवस ईतकी आहे.
३ ) काक २ ( पिकेव्हि काबुली - २ )
काक २ हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. हा वान देखील अधिक टपोर्या दाण्याचा असल्या मुळे यास चांगला बाजारभाव मिळतो. या वाणाची पक्वता साधारण ११० ते ११५ दिवस ईतकी आहे. या वांनापासून साधारण उत्पन्न २६ ते २८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके मिळू शकते.
४ ) कृपा
कृपा हा वान मर रोगास प्रतिकारक्षम आहे. या वानाच्या दाण्याचा रंग सफेद पांढरा असल्यामुळे याला आकर्षक बाजार भाव मिळतो. तसेच दाणे अधिक टपोरे असतात. या वाणाची पक्वता साधारण १०५ ते ११० दिवस ईतकी आहे. या वानापासून साधारण उत्पन्न १६ ते १८ क्विंटल प्रती हेक्टरी ईतके मिळू शकते.
बीजप्रक्रिया व जिवाणूसंवर्धन
बियाण्याच्या चांगल्या उगवणीसाठी तसेच पिकावर रोप अवस्थेत येणार्या बुरशीजण्य रोगापासून संरक्षण करण्यासाठी बिजप्रक्रिया करणे फार महत्वाची ठरते. पेरणीपूर्वी प्रतीकिलो बियाण्यास ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा किंवा २ ग्रॅम थायरम + २ ग्रॅम कार्बेन्डेझिम एकत्र करून चोळावे. तसेच यानंतर १० ते १५ किलो बियाण्याला २५० ग्रॅम रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया गुळाच्या थंड द्रावणातून चोळून करावी. रायझोबियम या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करण्यासाठी १ लीटर पाण्यात १२५ ग्रॅम गूळ घेवून तो वीरघळे पर्यंत पाणी कोमट करावे. नंतर बियाणे एक तासभर सावलीत सुकवून लगेच पेरणी करावी.
हरभरा खत नियोजन
हरभर्याच्या सुधारित जाती ( वान ) खत व पाणी यास चांगला प्रतिसाद देत असल्यामुळे यांना खताची योग्य मात्र देणे खूप गरजेचे ठरते. शेवटची कुळवणी करत असतांना हेक्टरी ५ टन चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतामद्धे पसरावे. त्यामुळे खत जमिनीत चांगले मिसळले जाते. शेतामद्धे जर खरीप हंगामात शेणखत वापरले असेल तर रब्बी हंगामात हरभर्यास शेणखत देण्याची गरज नाही. पिकाची पेरणी करतांना प्रती हेक्टरी २५ किलो नत्र आणि ५० किलो स्फुरद वापरावे. म्हणजे १२५ किलो डी.ए.पी. (१८:४६:००) किंवा ५० किलो युरिया व ३०० किलो सिंगल सुपर फॉस्फेट प्रती हेक्टरी द्यावे. याच बरोबर हेक्टरी ५० किलो पालाश दिले असता पिकाची रोगप्रतिकारक क्षमता वाढते. सुधारित वानांचा विचार केला असता अधिक उत्पन्नासाठी जमिनीचे मातिपरीक्षण करून खत नियोजन केल्यास नक्कीच उत्पन्नात वाढ होते. पीक फुलोर्यात असतांना २ टक्के यूरियाची फवारणी करावी त्यानंतर १० ते १५ दिवसांनी परत दुसरी एक फवारणी करावी. यामुळे पिकाच्या उत्पादनात वाढ होते.
हरभरा पिकातील कीड व रोग
हरभरा पिकावर प्रामुख्याने घाटेअळी चा प्रादुर्भाव आढळतो. ज्यामुळे उत्पन्नात बरीच घट होते. या किडीबरोबर मर रोग, कोरडी मुळकुज, ओली मुळकुज, खुजा रोग, तसेच मान कुजव्या या रोगांचा देखील प्रादुर्भाव आढळतो.
हरभरा पिकातील कीड
हरभर्या वरील घाटेअळी
हरभर्या वर घाटेअळी सुरवातीला पानावर तसेच कोवळ्या कळ्यांवर व नंतर घाट्यावर उपजीविका करते. घाटेअळी ही घाट्याला छिद्र पडून डोके आत घालते व आतील दाणे खाते. घाटेअळीच्या शरीराचा अर्धा भाग घाट्यात असतो व अर्धा भाग बाहेर असतो. या अळीमुळे पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट होते.
फवारणी / उपाय
पीक लहान असतांना या अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. याच बरोबर शेतामद्धे ८ ते १० फेरोमोन ( कामगंध ) सापळे लावावेत. तसेच यामध्ये अडकलेल्या पतंगाचा नाश करावा, यामुळे पुढील प्रजननास आळा बसतो. यानंतर प्रादुर्भाव आढळून आल्यास क्विनॉलफॉस २५ टक्के २० मी.ली किंवा क्लोरोपारीफॉस १५ मी.ली. किंवा लॅमडा सायहॅलोथ्रिन ८ ते १० मी.ली प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. या व्यतिरिक्त जास्त प्रादुर्भाव दिसल्यास इमामेक्टिन बेन्झोएट ४ ते ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.
मर रोग
हा रोग कोवळ्या रोपांवर फुजॅरियम ऑक्झिस्पोरम या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या रोपाच्या किंवा झाडाच्या खोडांचा भाग गर्द रंगहीन होतो. अश्या रोपांच्या खोडाचा उभा छेद घेवून पहिले असता मध्य पेशी गर्द तपकिरी किंवा काळ्या पडलेल्या दिसून येतात. रोपांच्या पानांचा रंग हिरवा राहून रोपे मारतात. प्रादुर्भाव ग्रस्त झाडाच्या फक्त फांद्या सुकलेल्या दिसतात.
फवारणी / उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी मर रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. हा रोग आढळून येताच बुरशी नाशकाची फवारनि करावी.
कोरडी मुळकुज
हा रोग रायझोक्टोनिया बटाटीकोला या बुरशीमुळे होतो. हरभर्या मध्ये फुलोरा अवस्था व घाटे लागण्याच्या वेळी होणारी कोरडी मुळकुज हा महत्वाचा रोग आहे. या रोगाचा प्रादुर्भाव झालेली झाडे सुकून चिपाडाच्या रंगाचे होतात. याच बरोबर मुळे ठिसुळ बनतात व त्यांना तंतुमुळे खूप कमी असतात.
ओली मुळकुज
ओली मुळकुज या रोगाची लागण झाल्यास रोपे पिवळी पडून वळतात, मरतात. हा रोग जमिनीत अधिक ओलावा असल्यास जास्त प्रमाणात दिसून येतो. या रोगामद्धे खोड व मुळे कुजून जातात आणि त्यावर गुलाबी बुरशीची वाढ झालेली दिसून येते.
फवारणी / उपाय
या रोगांच्या नियंत्रनासाठी रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. तसेच प्रमाणात गरजे नुसार पाणी द्यावे याच बरोबर शेतामद्धे पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. उत्तम निचरा होणार्या जमिनीची लागवडीसाठी निवड करावी. लागवड करतांना बिजप्रक्रिया करावी.
मान कुजव्या
हा रोग स्क्लेरोसीयम रोलाफिसाय या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रादुर्भाव पेरणीच्या वेळी जमिनीत जास्त ओलावा व उष्ण तापमान असल्यास होतो. या बुरशीची लागण झालेल्या रोपांच्या खोडाचा भाग बारीक होऊन कुजतो. त्यावर पांढरे पट्टे किंवा बुरशीच्या पेशींची वाढ झालेली दिसते, त्यावर नंतर मोहरीच्या आकाराच्या गोल बुरशीच्या गाठी दिसतात.
खुजा रोग
हा रोग विषाणूमुळे होतो तसेच या रोगाचा प्रादुर्भाव भारताच्या विविध भागात आढळून येतो. या रोगाचा प्रसार मावा व नाकतोड्यामार्फत होतो. या रोगामुळे झाडाची वाढ थांबुन पेरकांडे लहान पडतात. पाने लहान होवून पिवळी नारंगी किंवा तपकिरी होतात. निरोगी झाडापेक्षा प्रादुर्भाव ग्रस्त झाडांची पाने कडक, कठीण असतात तसेच खोडातील तंतुपेशी तपकिरी रंगाच्या पडतात.
फवारणी / उपाय
या रोगांच्या नियंत्रनासाठी रोग प्रतीकारक्षम जातीची निवड करावी. तसेच या रोगाचा प्रसार मावा व नाकतोड्यामार्फत होत असल्या मुळे या किडींचा वेळीच बंदोबस्त करावा.
तुषार सिंचन हरभरा पिकास वरदान
हरभरा पिकाची लागवड करत असतांना सुधारित वाणाची निवड केल्यास व तुषार सिंचन पद्धतीने पाणी दिल्यास उत्पादनात मोठी वाढ होते. हरभरा हे पीक पाण्यास अतिशय संवेदनशील असल्यामुळे या पिकास गरजेपेक्षा जास्त पाणी दिल्यास पीक उधळते यामुळे उत्पादनात मोठी घट होते. तुषार सिंचन पद्धतीमुळे पिकास आवश्यक त्यावेळी तसेच पाहिजे त्या प्रमाणात पाणी देता येते. याच बरोबर जास्त पाण्याचे प्रमाण झाल्यास होणार्या मुळकुज या रोगापासून होणारे नुकसानदेखील टळते. पाण्याचे योग्य नियोजन तसेच पाण्याची बचत देखील होते.
0 comments:
Post a Comment