कापूस लागवड | कापूस लागवडीची योग्य वेळ | कापसा वरील किड व रोग | कापसाचे खत नियोजन | कापूस लागवडीसाठी वानांची निवड | कापसाचे भरघोस उत्पादन
🙏 शेतकरी बांधवांनो कापूस लगवडीपासूनच जर किड व रोगाचे योग्य नियोजन केले तर कापूस हे पीक नक्कीच आर्थिक फायदा करून देणारे पीक ठरू शकते. कापसाच्या कमी उत्पादना मागे बरीच कारने आहेत. त्यामध्ये किड व रोगामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. कापसावर भारतामध्ये जवळपास १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवळपास २५ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनो कापसाच्या उत्पन्नात घट होण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे कीड व रोगा बद्दल माहिती नसणे व कीटकनाशकांच्या जास्त तसेच काही वेळा चुकीच्या फवारण्या करणे. यामुळे उत्पन्नात घट होतेच परंतु खर्च देखील वाढतो. यासाठी पिकाच्या वाढीच्या टप्यानुसार तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भावा नुसार वेळीच कीटकनाशकांची फवारणी तसेच इ. पद्धतींचा म्हणजे जैविक पद्धतीचा वापर करून वेळीच कीड व रोग व्यवस्थापन केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल.
कापूस लागवडीसाठी वानांची निवड
बागायती कापसाची लागवड करत असतांना सुधारित बीटी कापूस निवडावा तो निवडत असतांना प्रामुख्याने वाणाचे गुणधर्म म्हणजे पानावर जास्त लव असणारा व पाण्याचा तान सहन करू शकणारा तसेच उशिरा येणारा म्हणजे १६० दिवसांनपेक्षा जास्त कालावधी च्या वानाची निवड करावी पानावर जास्त लव असणार्या (पानावर असणारा केसासारखा भाग) वानाचा फायदा म्हणजे रस शोषण करणार्या किडींनचा कमी प्रादुर्भाव होतो. याच प्रकारे कोरडवाहु बीटी कापूस निवडत असतांना लवकर तयार होणार्या म्हणजे १६० दिवसांनपेक्षा कमी कलावधीत येणार्या वानाची निवड करावी.
कापूस लागवडीसाठी जमीन व अंतर
कापसाची लागवड करत असतांना मध्यम ते भारी तसेच पाण्याचा योग्य निचरा होणारी जमीन निवडावी. अतिउथळ तसेच चीबडणारी जमीन निवडू नये. बागायती कापसाची लागवड ५ X १ फुट किंवा ६ X १ फुट अंतरावर करावी तसेच कोरडवाहू कापसाची लागवड ३ X २ फुट किंवा ४ X १.५ फुट अंतरावर करावी.
लागवडीची योग्य वेळ
कापसावर गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बागायती कापसाची लागवड ही जून महिन्यात करावी. तसेच कोरडवाहू कापसाची लागवड ही जूनच्या दुसर्या - तिसर्या आठवड्यात करावी किंवा चांगला मुर पावूस झाल्यास लगेच लागवड करावी. मान्सून पेरणीपेक्षा धूळपेरणीमुळे १० ते १५ टक्के अधिक उत्पादन मिळते. यासाठी जूनच्या पहिल्या किंवा दुसर्या आठवड्यात तसेच पावसाचा अंदाज पाहून ७ ते १० दिवस आधी धूळपेरणी करावी यासाठी जास्त ढेकळे , जास्त तान असलेली तसेच भेगा पडलेली जमीन निवडू नये. याच बरोबर पावसाच्या लहरी पणामुळे पाण्याचे नियोजन करूनच धूळ पेरणी करावी.
कापसाचे खत नियोजन
कोणत्याही पिकाचे खत नियोजन करत असतांना माती परीक्षण केल्यास अधिक फायदा होतो. बागायती कापसाची लागवड करत असतांना हेक्टरी १५० किलो नत्र ७५ किलो स्फुरद व ७५ किलो पालाश द्यावे वरील खतापैकी पेरणीच्या वेळी २० टक्के नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाशची मात्र द्यावी आणि उरलेल्या नत्रापैकी ४० टक्के नत्र हे एक महिन्याने व उरलेले ४० टक्के नत्र हे दोन महिन्याने पेरून द्यावे. याच बरोबर कपाशिला फुले लागण्याच्या वेळी पेरणी नंतर साधारण ६० दिवसांनच्या नंतर १० ते १५ दिवसांनी २ टक्के नत्र ( यूरीय ) किंवा डी. ए. पी २०० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून पिकावर फवारणी केल्यास उत्पन्नात वाढ होते. याच बरोबर सुक्ष अन्नद्रव्याची कमतरता ओळखून त्यांची पूर्तता करावी. सूक्ष्म अन्नद्रव्यामुळे कपाशीवरील लाल्याचे प्रमाण कमी होते. ( रासायनिक खताबरोबर सूक्ष्म मूलद्रव्य देवू नयेत. )
कापसावरील कीड व रोग
शेतकरी बांधवांनो कापसावर मावा, तुडतुडे , फुलकिडे , पांढरी माशी, ठिपक्याची बोंडअळी , हिरवी बोंडअळी, गुलाबी बोंडअळी, पिठ्या ढेकूण या किडींचा प्रादुर्भाव आढळतो याच बरोबर दहिया ( ग्रेमिल्ड्यु ), अनुजीवि करपा, पानावरील ठिपके, मुळकुज व मर, कवडी इ. रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. या कीड व रोगांवरील उपाय सविस्तर जाणून घेवू.
कापसावरील कीड
१ ) कापसावरील मावा
कापसावर मावा या किडीचा प्रादुर्भाव पिकाच्या रोपअवस्थेत तसेच शेवटच्या अवस्थेत आढळतो. प्रौढ मावा आकाराने लांबट असून ते रंगाने पिवळसर ते गडद हिरवे किंवा काळे तर पिले ही फिकट रंगाची असतात. यांची लंबी १ ते २ मी. मी. असते. मावा किडीचे प्रौढ तसेच पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने तसेच पिकाच्या कोवळ्या फांदीवर समूहाने राहून रस शोषण करतात. या किडीमुळे पाने आकसतात ज्याला आपण बोकडा असे म्हणतो. हिकिड रस शोषण करण्याबरोबरच शरीरातून साखरेच्या पाकासारखा गोड चिकट पदार्थ सोडतात. यामुळे पाने व झाड चिकट होते. कालांतराने या चिकट पदार्थावर काळ्या बुरशीची वाढ होऊन संपूर्ण झाड काळसर दिसू लागते. बुरशी मुळे पिकाची सूर्यप्रकाशात अन्नतयार करण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. परिणामी झाडांची वाढ खुंटते त्यामुळे उत्पन्नात देखील घाट होते. पिकाच्या शेवटच्या अवस्थेत जर माव्याचा प्रादुर्भाव झाला तर बोंडे उमलत नाहीत कापसाच्या प्रतिवरही परिणाम होतो.
फवारणी / उपाय
या किडीच्या नियंत्रणासाठी सुरवातीला ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. तसेच मावा कीड आढळून आल्यास ऑसिफेट २० ग्रॅम किंवा डायमेथोएट १० मि.ली. किंवा मिथिलडिमेटॉन १० मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( लागवडी नंतर पीक ४ -५ पानावर असतांना लिंबोळी अर्काची १५ दिवसांच्या अंतराने दोन तीन फवारण्या केल्यास अळी व ईतर किडींचा प्रादुर्भाव कमी होतो. )
२ ) कापसावरील तुडतुडे ( Leaf Hopper )
तुडतुडे हे पाचरीच्या आकाराचे तसेच दोन ते चार मी.मी. लांबीचे असतात. त्यांचा रंग फिकट हिरवा असतो पिल्लांणा पंख नसतात आणि ते नेहमी तिरके चालतात. पिल्ले आणि प्रौढ तुडतुडे पानाच्या खालच्या बाजूने राहून पानातील रस शोषून घेतात. त्यामुळे अशी पाने निस्तेज पिवळी दिसतात तसेच पाने लाल - तांबडी भुरकट होवून कडा मुरगळतात ( टोपीच्या आकाराची ) परिणामी झाडाची नीट वाढ होत नाही. अशा झाडांना पात्या, फुले व बोंडे कमी प्रमाणात लागतात. तुडतूड्यांचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने पूर्ण वाळून जातात.
फवारणी / उपाय
पिकावर तुडतूड्यांचा प्रादुर्भाव जांनवल्यास ईमिडाक्लोप्रिड ३ ते ४ मि.ली किंवा असिटामिप्रिड २ ते ३ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ( शिफारशी प्रमाणे व किडींच्या प्रादुर्भावा नुसार कीटकणाशकांचे प्रमाण कमी जास्त होवू शकते सल्ला घेवूनच कीटकणाशके वापरावीत )
३ ) कापसावरील फुलकिडे
फुलकिडे हे आकाराने लहान असतात. या किडीची मादी साधारण ६० ते ७० अंडी घालते. अंड्यातून पिल्ले साधारण २ ते ५ दिवसात बाहेर येतात. या किडींची बाल अवस्था ही ४ ते ७ दिवसांची असते. प्रौढ फुलकिडे व पिल्ले पानामागील भाग तसेच बोंडे खरवडून त्यामधून निघणारा रसशोषून घेतात. त्यामुळे पानाच्या वरील बाजूला तपकिरी रंगाचे व खालच्या बाजूने पांढरट चट्टे दिसून येतात. नंतर पान निस्तेज होवून वाळते.
फवारणी / उपाय
पिकावर फूलकिडींचा प्रादुर्भाव अढळून आल्यास ऑसिफेट १० ग्रॅम किंवा ईमिडाक्लोप्रिड ३ ते ४ मि.ली किंवा असिटामिप्रिड २ ते ३ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
४ ) कापसावरील पांढरी माशी ( White Fly )
पांढरी माशी आकारणे लहान असते. पांढर्या माशीची एक माशी साधारणपने १५० अंडे घालते पांढर्या माशीचे पिल्ले साधारण ८ ते १० दिवसात बाहेर येतात. माशीचे पिल्ले तसेच प्रौढ पानाच्या खालच्या बाजूने राहून रसशोषण करतात. अशीपाने कोमेजून जातात व प्रादुर्भाव जास्त असल्यास पाने लालसर ठिसुळ होतात व वाळतात. याच बरोबर पांढर्या माशीचे पिल्ले माव्या प्रमाणेच शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात व त्यावर नंतर काळ्या बुरशीची वाढ होते. परिणामी झाड चिकट होवून झाडाची वाढ व्यवस्थित होत नाही किंवा वाढ खुंटते.
फवारणी / उपाय
कापसावर पांढर्या माशीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ऑसिफेट २० ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस १० मी. लि. किंवा डायफेणथ्युरॉन ८ ग्रॅम किंवा थायमीथोक्झाईम ५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी
५ ) कापसावरील ठिपक्याची बोंडअळी
कापसाच्या लागवडिंनंतर साधारण एक महिन्याने या आळीचा प्रादुर्भाव आढळून येतो. ही अळी गर्द तपकिरी रंगाची असून तिच्या अंगावर काळे व बदामी ठिपके असतात त्याच बरोबर तिच्या अंगावर बारीक काटे देखील असतात. पूर्ण वाढ झालेल्या अळीची लांबी साधारण १९ मी. मी. असते. या अळिचा प्रादुर्भाव पिकाच्या प्रथम अवस्थेत आढळून येतो. प्रथम अवस्थेत अळी शेंडा पोखरते व आतील भाग खाते त्यामुळे शेंडे सुकतात व गळतात. कपाशीला पात्या लागल्यानंतर व पुढील काळात काळ्या, फुले तसेच हिरव्या बोंडांना छिद्रे पाडून आतील भाग खाते. अळीने खाल्लेले जे मोठे बोंडे झाडावर राहतात त्यामध्ये अळीची लाळ पडल्यामुळे अशी बोंडे पूर्ण पकण्याच्या अगोदरच फुटतात. त्यामुळे कापसाची प्रत खालावते.
फवारणी / उपाय
ठिपक्याच्या बोंडअळीचा प्रादुर्भाव अढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी
६ ) कापसावरील हिरवी बोंड अळी ( अमेरिकन )
या किडीचा प्रादुर्भाव अनेक पिकांवर आढळून येतो. हिरव्या बोंड अळीचा पतंग फिकट पिवळा बदामी रंगाचा असतो. त्याचे मागील पंख धुरकट रंगाचे असतात. या किडीच्या लहान अळ्या अंशतः पारदर्शी , पिवळसर व पांढर्या असतात आणि पूर्ण वाढ झालेली अळी हिरव्या रंगाची असते व कडेने दोन्ही बाजूला गर्द करड्या रेषा असतात. ही कीड सुरवातीला कोवळी पाने , काळ्या तसेच फुलांवर उपजीविका करते. तसेच बोंडे आल्यावर त्यांना छिद्रे पाडून आत डोके घालून बोंडाचा आतील भाग पोखरून खाते. त्यामुळे पात्या, लहान बोंडे , फुले व कळ्या गळून पडतात. अळीचा अर्धा भाग बोंडाच्या बाहेर असतो. एक अळी ३० ते ४० बोंडांना नुकसान पोहोचवते.
फवारणी / उपाय
हिरव्या बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी
७ ) कापसावरील शेंदरी बोंडआळी ( गुलाबी बोंडआळी )
कपाशीवर सर्वात जास्त शेंदरी बोंडआळी मुळे नुकसान होते. कपाशीवरील या किडीचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोंबर - नोव्हेंबर या कालावधी मध्ये अधिक असतो. या अळीचा पतंग छोटा तसेच गर्द बदामी रंगाचा असतो. त्याच्या पंखावर बारीक काळे ठिपके असतात. लहान अळि सुरवातीला फिकट हिरवी असते व नंतर पांढरी होवून तिसर्या अवस्थेत तिला गुलाबी शेंदरी रंग प्राप्त होतो. या किडीची अळि सुरवातीला पात्या, फुले व काळ्या यावर उपजीविका करते. अळि फुले किंवा बोंडे यांना बारीक छिद्र करून आत शिरते. प्रादुर्भावग्रस्त पाती व बोंडे गळून पडतात. याच बरोबर फुले अर्धवट उमललेल्या गुलाबाच्या कळीसारखी दिसतात. बोंडामधील अळि बियांना छिद्र करून सरकी खाते. त्यामुळे रुईची प्रत खराब होते तसेच सरकीतील तेलाचे प्रमाण देखील कमी होते. अळि बोंडामध्ये आत शिरल्यानंतर विष्ठेने छिद्र बंद करते आळी आत शिरल्यानंतर वरुण तिचा प्रादुर्भाव लक्षात येत नाही.
फवारणी / उपाय
या अळीच्या चांगल्या नियंत्रणा साठी फेरोमोन ( कामगंध ) सापळ्यांचा वापर करावा. शेंदरी बोंडअळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ४ ते ५ मि. लि. किंवा सायपरमेथ्रिन ३ ते ४ मी. लि. किंवा स्पीनोसॅड २ ते ३ मि. लि. किंवा क्विनॉलफॉस २० मि. लि. किंवा प्रोफेनोफोस १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्या मिसळून फवारणी करावी ( प्रादुर्भाव जास्त आढळल्यास अंतर प्रवाही कीटकणाषकाचा शिफारशी प्रमाणे फवारणी साठी वापर करावा. )
कापसावरील रोग
१ ) कापसावरील दहिया ( ग्रेमिल्ड्यु )
दहिया हा रोग रामुलेरिय एरिओला ( रॅम्युलारीय गॉसिपाय ) या बुरशीमुळे होतो. दहिया हा रोग अतिआद्रता तसेच ओलसर हवामान अश्या वातावरणात येतो. हारोग ज्यादातार नोन बीटी म्हणजेच देशी कापसाच्या वानावर आढळतो. हा रोग झाडाच्या सर्वात खलील पानांवर किंवा जमिनी लगतच्या पानांवर आढळून येतो. यामध्ये प्रथम पानांवर पांढर्या रंगाचे ठिपके किंवा पट्टे दिसतात. हा रोग खालच्या बाजूने वरच्या बाजूकडे पसरत जातो. या मध्ये पानांवर दही शिंपडल्यासारखे डाग दिसतात या डागाला झटकल्यास डागाखाली लाल डाग (धब्बे ) दिसतात. प्रादुर्भाव वाढत गेल्यास असे पान पुढे लाल होते व नंतर पूर्ण झाड लाल दिसू लागते.
फवारणी / उपाय
दहिया या रोगाच्या नियंत्रणा साठी पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. किंवा ट्रायडीमॉर्फ ०.१ टक्के ८० टक्के प्रवाही या बुरशीनाशकाची फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )
२ ) कापसावरील अणुजीवी करपा
हा रोग झन्थोमोनास ऑक्सेनोपोडीस पॅंथोव्होरा मालव्हेसीरम या सूक्ष्म जिवाणू मुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूने कोणात्मक ठिपके दिसतात. रोगाच्या प्रादुर्भावानुसार पानाच्या प्रमुख तसेच उपशिरा काळ्या पडतात याच बरोबर फांद्यावर तांबड्या किंवा काळपट रंगाचे ठिपके दिसतात. बोंडावर सुद्ध अश्याच प्रकारचे डाग दिसून येयात यामुळे बोंडातील कापूस पिवळा पडतो.
फवारणी / उपाय
या रोगाची लक्षणे आढळून येताच स्ट्रेप्टोसायक्लीन १०० पी.पी.एम. १ ग्रॅम + कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. प्रादुर्भाव जास्त असल्यास किंवा गरज वाटल्यास १० ते १५ दिवसाच्या अंतराने पुन्हा एकदा फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )
३ )कापसाच्या पानावरील ठिपके
हा रोग अल्टरनेरीया मॅक्रोस्पोरा या बुरशीमुळे होतो. या रोगामद्धे सुरवातीच्या काळात पानांवर पिवळट तसेच भुरकट रंगाचे गोलाकार बारीक ठिपके दिसून येतात. असे ठिपके नंतर वाढून मोठे होतात. व त्यांचा मधील भाग राखाडी रंगाचा होतो. नंतर असा राखाडी रंगाचा भाग फाटतो किंवा गळून पडतो.
फवारणी / उपाय
या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )
४ ) मुळकुज व मार
मुळकुज हा रोग रायझोक्टोंनीय बटाटाकोला , सोलॅनि या बुरशीमुळे होतो. यामध्ये झाडाची पाने कोमेजतात व शेंडे माना टाकतात. झाडाची मुळे कुजतात व झाड उपटल्यास ते सहज उपटून येते. तसेच कापसावर मर हा रोग दोन प्रकारात आढळतो पहिल्या प्रकारात मर रोग फुजॅरियम ऑक्झीस्पोरम पॅथोव्हार व्हासइन्फोक्टम या बुरशीमुळे होतो. यारोगाचे प्रमुख लक्षणे म्हणजे सुरवातीला रोपाची पाने भुरकट किंवा पिवळसर दिसतात. पुढे चालून पाने गळून जातात. दुसर्या प्रकारात मररोग व्हर्टीसिलियम हिडली या बुरशीमुळे होतो. फुजॅरियमच्या मर रोगात झाडे वरच्या बाजूने खाली वाळत येतात. तर याउलट व्हर्टीसिलियमच्या बाबतीत झाडे खालच्या बाजूने वर वाळत जातात.
फवारणी / उपाय
या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागवडी पूर्वी थायरम ३ ग्रॅम प्रती किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करावी. प्रादुर्भाव झालेली झाडे उपटून नष्ट करावीत. लागवडी साठी रोगप्रतिकारक जातींचीच निवड करावी. प्रादुर्भाव आढळून आल्यास बुरशींनाशकाची फवारणी करावी तसेच शिफारसी प्रमाणे झाडांना बुरशींनाशकाच्या द्रवणाची आळवनि करावी.
५ ) कवडी
कवडी हारोग कोलेटोट्रिकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगामद्धे बोंडावर तेलकट चट्टे दिसतात तसेच बोंडातील कापूस सरकीला घट्ट चिकटतो. तसेच बोंडे अर्धवट उमलतात.
फवारणी / उपाय
या रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कॉपर ऑक्झीक्लोराईड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त प्रादुर्भाव कमी जास्त असल्यास शिफारशी प्रमाणे ईतर बुरशीनाशकांचा वापर करावा )
🙏🙏 शेतकरी बांधवांनो रस शोषण करणार्या किडींच्या तसेच नुकसान करणार्या अळ्यांच्या चांगल्या नियंत्रणा साठी पिवळे व निळे चिकट ट्रॅप तसेच अळ्या साठी फेरोमन (कामगंध) ट्रॅप (सापळे) वापरल्यास फवारणी खर्च व काही फवारण्या कमी होण्यास नक्कीच मदत व्होईल. 🙏🙏
SEGA GENESIS - GAN-GAMING
ReplyDeleteSEGA GENESIS. nba매니아 GENESIS-HANDS. Genesis (JP-EU). sol.edu.kg NA. NA. jancasino NA. casinosites.one SEGA GENESIS-HANDS. NA. SEGA septcasino.com GENESIS. NA. GENESIS-HANDS. NA.
Post a Comment