नमस्कार मित्रांनो आधीच्या दोन भागांमध्ये नत्र आणि स्फुरद या घटकांच्या कमतरतेची लक्षणे पाहिली आता यामध्ये बघूया पालाश च्या कमतरतेची लक्षणे व उपाय
1) मित्रांनो पालाश म्हणजे की पोटॅश या घटकाच्या कमतरतेची लक्षणे फुटीच्या मधल्या भागातील पानावर दिसतात त्यामध्ये पानांचा लालसर तपकिरी रंग कडेक कडून मध्य भागाकडे शिरा पर्यंत पसरतो
2) यामध्ये पानाच्या कडा वर लालसर तपकिरी डाग पडून कडा वाळतात व खालच्या किंवा वरच्या बाजूस वळतात
3) द्राक्ष पिकावर उन्हाळी हंगामामध्ये घडासमोरील किंवा शेजारील पाने उन्हात असल्यास जांभळट व तपकिरी रंगाची होतात
4) द्राक्षाच्या वेलीवर घडांचे प्रमाण जास्त असल्यास पालाशच्या म्हणजेच पोटॅशच्या कमतरतेमुळे पानगळ सुरू होते
5) पोटॅशची कमतरता जास्त प्रमाणात असल्यास घड लहान व घट्ट राहून मनी एकावेळी पिकत नाहीत
6) द्राक्षाचे नवीन पाने पिवळसर होऊन कडेच्या बाजूस नेक्रोटिक ठिपके दिसतात
7) पोटॅशच्या कमतरतेमुळे घडाची वाढ व मण्यांची पीकण्याची अर्थात पाणी उतरण्याची प्रक्रिया मंदावते
1) जमिनीमध्ये पाण्याचा प्रमाणात निचरा होणाऱ्या जमिनी
2) द्राक्षाच्या वेलीवरची कमी अधिक प्रमाणात फळधारणा तसेच कमी पाऊस काळ किंवा अपुरा पाणीपुरवठा आशा परिस्थितीमध्ये देखील पालाशची म्हणजेच पोटॅशची कमतरता निर्माण होऊ शकते
पिकामधील किंवा जमिनीमधील पालाश या अन्नद्रव्याची म्हणजेच पोटॅशिची कमतरता खालील प्रकारे दूर करता येईल
द्राक्ष बागेमध्ये वेळोवेळी योग्य त्या प्रमाणात पालाश युक्त खताचा वापर केल्यास पालाशची कमतरता दूर करता येते. द्राक्ष पिकामध्ये म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश इत्यादी खते वापरतात. यामध्ये मेरिट ऑफ पोटॅश द्राक्ष पिकास काही प्रमाणात हानिकारक ठरते. या खतांचा वापर जास्त प्रमाणात झाल्यास वेलीची पाणीही करपतात यामुळे द्राक्ष वेलींना सल्फेट ऑफ पोटॅश नायट्रेट ऑफ पोटॅश इत्यादी क्लोराईड नसलेली खते वापरावीत