बटाटे लागवड
बटाटे लागवड, जमीन , बटाटे बियाणे प्रक्रिया, बटाटे खते व्यवस्थापन, बटाट्यावरील कीड व रोग
बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे.
बटाटा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते.
जमीन
मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्याची जमीन ही बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा सामु सहा ते आठ च्या दरम्यान असावा.
बियाणे प्रक्रिया
बटाटे लागवडीसाठि हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे पुरेसे असते. लागवडीसाठी बियाणे निवडतांना चांगल्या दर्जाचे निवडावे. लागवडीपूर्वी बटाटे क्लोरीनेटेड पाण्यात धुवावे तसेच बटाट्याच्या फोडी करतांना कोयता ब्लॉयटॉक्स ( 0.3 टक्के ) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड या औषधाच्या द्रावनात वरचे वर बुडवून घ्यावा. लागवडीपूर्वी बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) कॅप्टन ३० ग्रॅम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून त्या द्रवनामध्ये बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) ५ मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात.
खते व्यवस्थापन
बटाटे लागवडी आधी हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच लागवडीपूर्वी हेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद १२० किलो पालाश द्यावे.या व्यतिरिक्त १ महिन्याने हेक्टरी ५० किलो नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी.
अंतर मशागत
बटाट्याच्या पिकामध्ये अंतर मशागत करत असतांना तन काढणे तसेच खुरपणी याच बरोबर भर देणे हे महत्वाचे कामे आहेत. ३ ते ४ वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी तसेच खताचा दूसरा डोस देत असतांना झाडांना मातीची भर द्यावी. ( भर देणे म्हणजेच झाडाच्या बुडाला माती लावणे )
बटाट्यावरील कीड व रोग
बटाटा या पिकामध्ये देठ कुरतडणारी अळी, बटाटे पोखरणारी आळी किंवा पाकोळी, मावा, तुडतुडे, लाल कोळी, पाने खणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. याच बरोबर करपा ( लवकर येणारा व उशिरा येणारा ) मर रोग, बांगडी रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो.
style="display:block; text-align:center;"
data-ad-layout="in-article"
data-ad-format="fluid"
data-ad-client="ca-pub-9904937471916771"
data-ad-slot="2780728970">
बटाट्यावरील किड
देठ कुरतडणारी आळी
बटाट्यामध्ये देठ कुरतडणारी आळी ही राखाडी रंगाची असून ती रात्रीच्या वेळी जमिनीलगत खोडाजवळील भाग कुरतडते तसेच पाने व कोवळे देठ देखील खातात.
फवारणी / उपाय
या आळीच्या नियंत्रणासाठी मीथाइल पॅराथीऑन हे कीटकनाशक हेक्टरी २५ किलो या प्रमाणात पिकामध्ये धुरळावे तसेच या कीडीच्या नियंत्रणासाठी खंदणी करतांना क्लोरोपायरीफॉस मातीमध्ये मिसळावे. पिकाच्या दोन ओळींमध्ये गवताचे ढीग ठेऊन त्याखाली लपलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात.
बटाटे पोखरणारी आळी
या अळ्या प्रथम पाने पोखरतात व नंतर शेतामध्ये तसेच साठवणीत बटाटे पोखरतात.
फवारणी / उपाय
या अळ्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. ली. किंवा क्विनॉलफॉस २० किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळनारी भुकटी ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच परोपजीवीकीटक कोपीडिसोमा कोहलेरी यांचे प्रती हेक्टरी ५०,००० प्रौढ किंवा १२५० ममीज या प्रमाणात पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर आठवड्याच्या अंतराने ४ वेळा शेतात सोडावे.
मावा व तुडतुडे
मावा व तुडतुडे या दोन्ही किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात जास्त उपद्रव झालेल्या झाडांची पाने मुरडतात तसेच पिवळी पडून जळून जातात.
फवारणी / उपाय
बटाट्यामध्ये लागवडीनंतर १५ दिवसांनी किंवा या कीडीचा उपद्रव आढळल्यास मिथील डेमेटॉन १० मी.ली किंवा फॉस्फोमीडॉन ८५ डब्ल्यु एमसी १० मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी
लाल कोळी
लाल कोळी ही कीड पानातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पाने व झाडे तांबूस रंगाची दिसू लागतात. व झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते.
फवारणी / उपाय
या किडीच्या नियंत्रणासाठी १० लीटर पाण्यात २० ते २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा डायकोफॉल १८.५ ई. सी. हे कोळी नाशक १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून बटाट्यावर फवारावे.
पाने खणारी आळी
बटाट्यावर या आळीचा प्रादुर्भाव झाडांच्या वाढीवर परिणाम करतो. या अळ्या झाडांची पाने खातात. त्यामुळे झाडांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो परिणामी झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही व उत्पादन कमी येते.
फवारणी / उपाय
पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरो + सयपरमेथ्रिन १५ मी.ली. किंवा क्वीनॉलफॉस २० मी.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस १५ मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या व्यतिरिक्त पाने खाणार्या आळयांच्या नियंत्रणासाठी एस. एल, एन. पी, वी. हे विषाणू ५०० मी.ली. प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.
बटाट्यावरील रोग
बटाट्यावरील करपा ( लवकर व उशिरा येणारा करपा )
बटाट्यावर लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलानी या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर काळपट ठिपके दिसतात. तसेच यामुळे पाने करपून गळतात. याच प्रकारे उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोरा इनफेस्टन्स या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर पानथळ, फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात.
फवारणी / उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठी बेणे लागवड तयार करत असतांना बीज प्रक्रिया करून लावावे. तसेच रोग प्रतिकारक्षम जातीची निवड करावी. पीक लहान असतांना मॅन्कोझेब २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारावे. त्याच प्रकारे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम यापैकी कोणतेही एक औषध १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.
मर रोग
बटाटा पिकामध्ये फुजॅरियम या बुरशीमुळे झाडांची पाने पिवळी होतात. व झाडे मरतात त्याच प्रकारे बटाट्यामध्ये व्हर्टीसिलीयम या बुरशीमुळे झाडे ही खालून वरच्या बाजूला पिवळसर होत जाऊन पाने गळतात. व पाने जळाल्यासारखी दिसतात.
फवारणी / उपाय
या रोगाच्या नियंत्रणासाठि पिकांची फेरपालट करावी तसेच पिकाला नियमित पाण्याच्या पाळया देऊन हा रोग आटोक्यात आनता येतो. लागवडीच्या वेळी ५ किलो ट्रायकोडर्मा + २५ क्विंटल निंबोली पेंड प्रती हेक्टरी मिसळावी. याच प्रकारे जमिनीमध्ये नॅप्थलीन किंवा फॉरमॅलीन ( १:५० ) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते.
बांगडी रोग
बटाट्यावरील हा रोग क्लेव्हीबॅक्टर मीचीगॅनेन्सीस या अनूजीवापासून होतो. रोगाची लागण झालेली झाडे ही पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसतात आणि अचानक मारतात. तसेच रोगट बटाटे कापल्यावर आत बांगडीच्या आकाराचा तपकिरी रंगाचा रोगट भाग दिसतो.
फवारणी / उपाय
या जिवाणूजन्य रोगाची लागण झालेली बटाटे बेण्यासाठी वापरू नये. रोगग्रस्त बटाटे नष्ट करावेत. तसेच बटाट्याची लागवड करत असतांना स्ट्रेप्टोसयक्लीन चे दोनशे पी.पी. एम च्या द्रवणात बेणे एक तास बुडवून लावावी.
Share this post your farmer friend