कापसा वरील किड व रोग
कापूस लागवड | कापूस लागवडीची योग्य वेळ | कापसा वरील किड व रोग | कापसाचे खत नियोजन | कापूस लागवडीसाठी वानांची निवड | कापसाचे भरघोस उत्पादन 🙏 शेतकरी बांधवांनो कापूस लगवडीपासूनच जर किड व रोगाचे योग्य नियोजन केले तर कापूस हे पीक नक्कीच आर्थिक फायदा करून देणारे पीक ठरू शकते. कापसाच्या कमी उत्पादना मागे बरीच कारने आहेत. त्यामध्ये किड व रोगामुळे होणारे नुकसान हे प्रमुख कारण आहे. कापसावर भारतामध्ये जवळपास १६२ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यापैकी महाराष्ट्रात जवळपास २५ प्रकारच्या किडींचा प्रादुर्भाव आढळून येतो. शेतकरी बांधवांनो कापसाच्या उत्पन्नात घट होण्यामागील आणखीन एक कारण म्हणजे कीड व रोगा बद्दल माहिती नसणे व कीटकनाशकांच्या जास्त तसेच काही वेळा चुकीच्या फवारण्या करणे. यामुळे उत्पन्नात घट होतेच परंतु खर्च देखील वाढतो. यासाठी पिकाच्या वाढीच्या टप्यानुसार तसेच रोग व किडींच्या प्रादुर्भावा नुसार वेळीच कीटकनाशकांची फवारणी तसेच इ. पद्धतींचा म्हणजे जैविक पद्धतीचा वापर करून वेळीच कीड व रोग व्यवस्थापन केल्यास नक्कीच आर्थिक फायदा होईल. कापूस ( पांढरे सोने ) कापूस ला