बटाटे लागवड

 बटाटे लागवड

 बटाटे लागवड, जमीन ,  बटाटे बियाणे प्रक्रिया, बटाटे खते व्यवस्थापन, बटाट्यावरील कीड व रोग 

बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे.

बटाटा हे  कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य  तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित  बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते. 

जमीन

मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्‍याची जमीन ही  बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा सामु सहा ते आठ च्या दरम्यान असावा. 

बियाणे प्रक्रिया

 बटाटे लागवडीसाठि हेक्टरी १५ ते २० क्विंटल बियाणे पुरेसे असते. लागवडीसाठी बियाणे निवडतांना चांगल्या दर्जाचे निवडावे. लागवडीपूर्वी बटाटे क्लोरीनेटेड पाण्यात धुवावे तसेच बटाट्याच्या फोडी करतांना कोयता ब्लॉयटॉक्स ( 0.3 टक्के ) किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड या औषधाच्या द्रावनात वरचे वर बुडवून घ्यावा.  लागवडीपूर्वी बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) कॅप्टन ३० ग्रॅम किंवा बावीस्टीन १० ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम  १० लीटर पाण्यात मिसळून त्या द्रवनामध्ये बियाणे ( तयार केलेल्या फोडी ) ५ मिनिटे बुडवून लागवडीसाठी वापराव्यात. 

खते व्यवस्थापन 

बटाटे लागवडी आधी हेक्टरी ४० ते ५० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत द्यावे. तसेच लागवडीपूर्वी हेक्टरी १०० किलो नत्र, ६० किलो स्फुरद १२० किलो पालाश द्यावे.या व्यतिरिक्त १ महिन्याने हेक्टरी ५० किलो नत्र खताची दुसरी मात्रा द्यावी.

अंतर मशागत

बटाट्याच्या पिकामध्ये अंतर मशागत करत असतांना तन काढणे तसेच खुरपणी याच बरोबर भर देणे हे महत्वाचे कामे आहेत. ३ ते ४ वेळा खुरपणी करून जमीन भुसभुशीत ठेवावी तसेच खताचा दूसरा डोस देत असतांना झाडांना मातीची भर द्यावी. ( भर देणे म्हणजेच झाडाच्या बुडाला माती लावणे ) 

बटाट्यावरील कीड व रोग 

बटाटा या पिकामध्ये देठ कुरतडणारी अळी, बटाटे पोखरणारी आळी किंवा पाकोळी, मावा, तुडतुडे, लाल कोळी, पाने खणारी अळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. याच बरोबर करपा ( लवकर येणारा व उशिरा येणारा ) मर रोग, बांगडी रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळतो. 

बटाट्यावरील किड 

देठ कुरतडणारी आळी 

बटाट्यामध्ये देठ कुरतडणारी आळी ही राखाडी रंगाची असून ती रात्रीच्या वेळी जमिनीलगत खोडाजवळील भाग कुरतडते तसेच पाने व कोवळे देठ देखील खातात. 

फवारणी / उपाय

या आळीच्या नियंत्रणासाठी मीथाइल पॅराथीऑन हे कीटकनाशक हेक्टरी २५ किलो या प्रमाणात पिकामध्ये धुरळावे तसेच या कीडीच्या नियंत्रणासाठी खंदणी करतांना क्लोरोपायरीफॉस मातीमध्ये मिसळावे. पिकाच्या दोन ओळींमध्ये गवताचे ढीग ठेऊन त्याखाली लपलेल्या अळ्या गोळा करून नष्ट कराव्यात. 

बटाटे पोखरणारी आळी

या अळ्या प्रथम पाने पोखरतात व नंतर शेतामध्ये तसेच साठवणीत बटाटे पोखरतात. 

फवारणी / उपाय

या अळ्याच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. ली. किंवा  क्विनॉलफॉस २० किंवा कार्बारील ५० टक्के पाण्यात मिसळनारी भुकटी ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच परोपजीवीकीटक कोपीडिसोमा कोहलेरी यांचे प्रती हेक्टरी ५०,००० प्रौढ किंवा १२५० ममीज या प्रमाणात पीक ४५ दिवसांचे झाल्यानंतर आठवड्याच्या अंतराने ४ वेळा शेतात सोडावे. 

मावा व तुडतुडे

मावा व तुडतुडे या दोन्ही किडी पानातील अन्नरस शोषून घेतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात जास्त उपद्रव झालेल्या झाडांची पाने मुरडतात तसेच पिवळी पडून जळून जातात. 

फवारणी / उपाय 

बटाट्यामध्ये लागवडीनंतर १५ दिवसांनी किंवा या कीडीचा उपद्रव आढळल्यास मिथील डेमेटॉन १० मी.ली किंवा फॉस्फोमीडॉन ८५ डब्ल्यु एमसी १० मि.ली. १० लीटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी करावी 

लाल कोळी

लाल कोळी ही कीड पानातील अन्नरस शोषून घेते. त्यामुळे पाने व झाडे तांबूस रंगाची दिसू लागतात. व झाडांची वाढ खुंटते आणि उत्पादनात घट होते. 

फवारणी / उपाय

या किडीच्या नियंत्रणासाठी १० लीटर पाण्यात २० ते २५ ग्रॅम पाण्यात विरघळणारे गंधक किंवा डायकोफॉल १८.५ ई. सी. हे कोळी नाशक १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून बटाट्यावर फवारावे. 

पाने खणारी आळी

बटाट्यावर या आळीचा प्रादुर्भाव झाडांच्या वाढीवर परिणाम करतो. या अळ्या झाडांची पाने खातात. त्यामुळे झाडांच्या अन्न तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण होतो परिणामी झाडांची वाढ व्यवस्थित होत नाही व उत्पादन कमी येते.

फवारणी / उपाय 

पिकामध्ये या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास क्लोरो + सयपरमेथ्रिन १५ मी.ली. किंवा क्वीनॉलफॉस २० मी.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस १५ मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या व्यतिरिक्त पाने खाणार्‍या आळयांच्या नियंत्रणासाठी एस. एल, एन. पी, वी. हे विषाणू  ५०० मी.ली. प्रती हेक्टरी ५०० लीटर पाण्यातून फवारावे.

बटाट्यावरील रोग

लवकर व उशिरा येणारा करपा

बटाट्यावरील करपा ( लवकर व उशिरा येणारा करपा )

बटाट्यावर लवकर येणारा करपा हा रोग अल्टरनेरिया सोलानी या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर काळपट ठिपके दिसतात. तसेच यामुळे पाने करपून गळतात. याच प्रकारे उशिरा येणारा करपा हा रोग फायटोप्थोरा इनफेस्टन्स या बुरशीमुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर पानथळ, फिकट तपकिरी रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात. 

फवारणी / उपाय 

या रोगाच्या नियंत्रणासाठी बेणे लागवड तयार करत असतांना बीज प्रक्रिया करून लावावे. तसेच रोग प्रतिकारक्षम जातीची निवड करावी. पीक लहान असतांना मॅन्कोझेब २० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १० दिवसाच्या अंतराने फवारावे. त्याच प्रकारे या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास मॅन्कोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्झिक्लोराईड ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोनील २५ ग्रॅम यापैकी कोणतेही  एक औषध १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने फवारावे.

मर रोग

बटाटा पिकामध्ये फुजॅरियम या बुरशीमुळे झाडांची पाने पिवळी होतात. व झाडे मरतात त्याच प्रकारे बटाट्यामध्ये व्हर्टीसिलीयम या बुरशीमुळे झाडे ही खालून वरच्या बाजूला पिवळसर होत जाऊन पाने गळतात. व पाने जळाल्यासारखी दिसतात.

फवारणी / उपाय 

या रोगाच्या नियंत्रणासाठि पिकांची फेरपालट करावी तसेच पिकाला नियमित पाण्याच्या पाळया देऊन हा रोग आटोक्यात आनता येतो. लागवडीच्या वेळी ५ किलो ट्रायकोडर्मा + २५ क्विंटल निंबोली पेंड प्रती हेक्टरी मिसळावी. याच प्रकारे जमिनीमध्ये नॅप्थलीन किंवा फॉरमॅलीन ( १:५० ) मिसळून दिल्यास रोगाचे बीज मरते. 

बांगडी रोग 

बटाट्यावरील हा रोग क्लेव्हीबॅक्टर मीचीगॅनेन्सीस या अनूजीवापासून होतो. रोगाची लागण झालेली झाडे ही पिवळी पडून कोमेजल्यासारखी दिसतात आणि अचानक मारतात. तसेच रोगट बटाटे कापल्यावर आत बांगडीच्या आकाराचा तपकिरी रंगाचा रोगट भाग दिसतो. 

फवारणी / उपाय 

या जिवाणूजन्य रोगाची लागण झालेली बटाटे बेण्यासाठी वापरू नये. रोगग्रस्त बटाटे नष्ट करावेत. तसेच बटाट्याची लागवड करत असतांना स्ट्रेप्टोसयक्लीन चे दोनशे पी.पी. एम च्या द्रवणात बेणे एक तास बुडवून लावावी. 

  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

टोमॅटो लागवड

टोमॅटो 

टोमॅटो लागवड, टोमॅटोचे महत्व, टोमॅटो खते नियोजन, टोमॅटो रोग माहिती, टोमॅटो फवारणी

                       शेतकरी बांधवांनो जसेकी आपल्याला माहीतच आहे की टोमॅटोचे रोजच्या आहारात किती महत्व आहे. तसेच भाजीपाला पिकामध्ये टोमेटोला महत्वाचे स्थान आहे. आपल्या राज्याचे हवामान या पिकास अनुकूल असून जमीन, पीक ( वान ), हवामान, पाणी, खत तसेच पीक संरक्षण व कीड आणि रोगाचे वेळीच नियोजन केल्यास टोमॅटोचे उत्पादन प्रती हेक्टर ६० ते ७० टीन पर्यंत सहज वाढू शकते.

          शेतकरी बांधवांनो आताच्या परिस्थिति नुसार वातावरणात सतत होणार्‍या बदलामुळे टोमॅटो पिकावर रोग व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून येतो. बर्‍याचदा अश्या परिस्थितीमध्ये शेतकरी बांधवांना आपला उभा टोमॅटोचा प्लॉट ( फड ) करपून जातांना पहावा लागतो. या मागील कारण वातावरन हे असुशक्ते परंतु रोगाबद्दल आणि किडीबद्दल अपुरी माहिती तसेच चुकीच्या फवारन्या  हे देखील कारण असू शकते. ( दोन्ही शक्यता नाकारता येत नाही.)  🙏  म्हणूनच शेतकरी बांधवांनो कुठल्याही पिकावर लागणारी कीटकनाशके, बुरशीनाष्के तसेच पिकाच्या अवस्ते नुसार लागणारी खते तसेच संजीवके यांच्या बद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे. खरेतर काळाची गरज आहे.🙏

टोमॅटोचे महत्व 

             टोमॅटोचा वापर जसा रोजच्या आहारामध्ये होतो तसाच बरेचसे प्रक्रियायुक्त पदार्थ बनवण्यासाठीसुद्धा होतो. त्यामध्ये टोमॅटो केचअप, टोमॅटो सूप, टोमॅटो सॉस, टोमॅटो चटणी इ. पदार्थ बनवता येतात. यामुळेसुद्धा चांगल्या प्रतीचे टोमॅटो उत्पादन केल्यास आर्थिक नफा होऊ शकतो. टोमॅटोवर आधारित प्रक्रिया उद्योगांना राज्यातच नव्हे तर देशातही मोठा वाव आहे. टोमॅटो हे एक संरक्षक अन्न असून टोमॅटोमधील लयकोपिन या अल्कलाईड रंगद्रव्यामुळे शरीरातील पेशी मरण्याचे प्रमाण हे कमी होते. टोमॅटो हे फळ आहारच्या दृष्टीने आरोग्यासाठि फायदेशीर आहे. 

टोमॅटो खते नियोजन

                 टोमॅटोची लागवड करत असतांना खत नियोजन हे फार महत्वाचे आहे. टोमॅटो लागवडीसाठी रेताड, मध्यम, काळी उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी. तसेच अति हलकी, क्षारयुक्त, चोपण, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये. साधारण जमिनीचा सामु साडे सहा ते सात असावा. टोमॅटोमध्ये खत व्यवस्थापन करत असतांना माती परीक्षण करून योग्य प्रमाणात खते वापरावी यामध्ये नत्र, स्फुरद व पालाश या खतांच्या व्यतिरिक्त कॅल्शियम, मॅग्नेशीयम, गंधक आणि याच बरोबर दुय्यम अन्नद्रव्ये तसेच जस्त, लोह, बोरॉन, मॅगनीज व तांबे इ. सूक्ष्म अन्नद्रव्य जमीन व पिकानुसार आवश्यकतेनुसार वापरावे.

१ ) टोमॅटो सेंद्रिय खतांचा वापर :- 

                      टोमॅटोमध्ये सेंद्रिय खत वापरायचे असल्यास प्रती हेक्टरी २५ टन चांगले  कुजलेले  शेणखत व २०० किलो निंबोळी पेंड यांचा वापर करावा. 

२ ) टोमॅटोमध्ये रसायनिक खते :-

                     टोमॅटोची लागवड जर मध्यम प्रकारच्या जमिनीमध्ये तसेच संकरीत वानासाठी हेक्टरी ३०० किलो नत्र, १५० किलो स्फुरद आणि १५० किलो पालाश वापरावे. त्याचप्रकारे सुधारित व सरळ वाणसाठी हेक्टरी २०० किलो नत्र १०० किलो स्फुरद आणि  १०० किलो पालाश यांचा वापर करावा. या व्यतिरिक्त संकरीत, सुधारित व सरळ वनासाठी हेक्टरी २५ किलो फेरस सल्फेट , २५ किलो मॅगनिज सल्फेट, ५ किलो बोरॉन व २५ किलो मॅग्नेशियम सल्फेट वापरावे. 

                     खते देतांना निम्मे नत्र, संपूर्ण स्फुरद व पालाश लागवडीच्या वेळी वापरावे. राहिलेले निम्मे नत्र १५, २५, ४०, ५५ दिवसांनी समान हप्त्यामध्ये विभागून बांगडी पद्धतीने झाडाच्या बुंध्यापासून ४ बोटांच्या अंतरावर मुळ्यांच्या क्षेत्रात माती आड करून द्यावे. तसेच खते दिल्यानंतर लगेच पाणी द्यावे याशिवाय सूक्ष्म व दुय्यम अन्नद्रव्य लागवडीपासून ५ ते ७ दिवसांनी देण्यास सुरुवात करावी. 

३ ) जैविक खते :- 

                  जैविक खतांचा वापर करत असतांना एकरी २ किलो अँझक्टोबॅक्टर २ किलो स्फुरद विरघळविणारे जिवाणू व २ किलो पालाश विरघळविणारे जिवाणू हे सर्व एक टन शेणखतामध्ये मिसळून वापरावे. 

टोमॅटो रोग माहिती 

                 टोमॅटो या पिकावर  पांढरी माशी, फुलकिडे, नाग आळी व फळे पोखरणारी आळी या किडींचा प्रादुर्भाव आढळतो. या बरोबर अर्ली ब्लाईट, लेट ब्लाईट ( लवकर व उशिरा ) येणारा करपा, बोकडा, ( पर्णगुच्छ ) फळसड, मर, भुरी, स्पॉटेड विल्ट व्हायरस इ. रोगांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने आढळतो. यांची लक्षणे व उपाय सविस्तर जाणून घेऊ.

टोमॅटोवरील कीड

पांढरी माशी

१ ) पांढरी माशी :-

                टोमॅटो या पिकावर सुरवातीला या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो. पांढरी माशी पानातील अन्नरस शोषून घेते त्यामुळे पिकाची पाने पिवळी पडतात. ही कीड पानांंतील रस शोषण करण्या सोबतच पारदर्शक द्रव पदार्थ टाकतात. त्या द्रवामुळे पानांवर काळी बुर्शी येते. त्यामुळे पिकाची वाढ कमी होते आणि उत्पादन कमी येते. या किडीच्या प्रादुर्भावामुळे लिफ कर्ल या रोगाचा देखील प्रसार होतो. म्हणून या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.

फवारणी / उपाय :-

               पांढर्‍या मशीच्या नियंत्रणासाठी  इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा डायमेथोएट १० मि. लि. किंवा मिथिलडिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. याच बरोबर शेतामद्धे पिवळे आणि निळे चिकट सापळे लावावेत यामुळे देखील रसशोषन करणार्‍या किडीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत मिळते.

फुलकिडे ( Thrips )

२ ) फुलकिडे :-

                    फुलकिडे ही देखील रसशोषण करणारी किड आहे. फुलकिडे हे पानातील अन्नरस शोषून घेतात  त्यामुळे पाने पांढरी होतात तसेच वाकडी तिकडी होतात. या किडीमुळे स्पॉटेड विल्ट व्हायरस या विषाणूमुळे होणार्‍या रोगाचा प्रसार होतो.

फवारणी / उपाय

                      शेतामद्धे या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास याकिडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट १० मि. लि. किंवा इमिडाक्लोप्रिड ४ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. १० लीटर पाण्यात निसळून फवारणी करावी.

 नाग आळी

३ ) नाग आळी :-

                  नाग आळीची माशी हि अगदी लहान असून ती सहजा सहजी निदर्शनास पडत नाही परंतु तिच्या आळीमुळे प्रादुर्भाव झालेलि पाने हि मोठ्या प्रमाणात दिसू लागतात. या किडीची आळी हि पानाच्या वरील पापुद्रयाखाली राहून त्यामधील हिरवा भाग पोखरून खातात व खातपुढे सरकते. त्यामुळे हि आळी जशी पुढे सरकते तशा पानांवर पांढर्‍या नागमोडी रेषा पडलेल्या दिसतात. नाग आळीच्या पानांवरील प्रादुर्भावामुळे पानांच्या अन्नतयार करन्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि उत्पन्न कमी होते.

फवारणी / उपाय

              पिकामध्ये हि किड आढळून आल्यास सायपरमेथ्रिन ५ मि. लि. किंवा डेल्टामेथ्रिन ४ मि. लि. किंवा फिप्रोनील १५ मि.लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

फळे पोखरणारी आळी

४ ) फळे पोखरणारी आळी

या किडीचा मादी पतंग हा पानांवर तसेच फुलावर अंडे घालतात. अंड्यातून आळी बाहेर पडल्यानंतर कोवळी पाने खावून वाढते व कालांतराने फळे आल्यावर फळे खावू लागते. हि आळी फळाला छिद्र पडून पुढील अर्धे शरीर फळात ठेवून फळ खाते. त्यामुळे फळे सडतात. जानेवारी ते मे दरम्यान या आळीचा प्रादुर्भाव जास्त असतो.

फवारणी / उपाय

               या आळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास डेल्टामेथ्रिन ५ मि. लि. किंवा मिथाईल डेमॅटॉन (२५ टक्के प्रवाही) १५ मि. लि. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन ५ ते ७ मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच या किडीचा फळांवरील प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कामगंध सापळ्यांचा वापर करावा. कामगंध सापळ्यांच्या वापरामुळे किड बर्‍याच प्रमाणात आटोक्यात येते.

टोमॅटोवरील रोग

लवकर येणारा करपा ( अर्ली ब्लाईट )

१ ) लवकर येणारा करपा ( अर्ली ब्लाईट )

                टोमॅटो पिकावर लवकर येणारा करपा  अल्टरनेरीय सोलाणी या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. लवकर येणार्‍या करप्याची लक्षणे प्रथम जुन्या पानांवर तसेच फांद्यां आणि फळांवर दिसतात. यामध्ये सुरवातीला राखाडी ते तपकिरी रंगाचे ठिपके पानांवर येतात नंतर ते हळूहळू केन्द्रित होतात व वाढू लागतात, या डागांभवती ठळक पिवळी कडा असते. यारोगाचा प्रादुर्भाव जसजसा वाढू लागतो तसे पूर्ण पान पिवळे होवून गळून पडते, त्यामुळे पानगळ मोठ्या प्रमाणात होते. तसेच  केंन्द्रित डाग हे फांद्यावर तसेच फळांवरती दिसू लागतात.

फवारणी / उपाय

               पिकामध्ये या रोगाची लागण होवू नये यासाठी लागवडीच्या वेळी जमिनीमध्ये प्रती एकरी २ किलो ट्रायकोडर्मा पावडर चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. शेतामध्ये या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास किंवा रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.

उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाईट )

२ ) उशिरा येणारा करपा ( लेट ब्लाईट )

                 टोमॅटो पिकावर उशिरा येणारा करपा फायटोप्थोरा इन्फेस्टन्स या नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. उशिरा येणार्‍या करप्याची लक्षणे पानांच्या वरच्या बाजूच्या कडेने थोडेसे तपकिरी हिरवे ठिपके येतात. कालांतराने हे ठिपके ( एकत्र येवून ) एकमेकात मिसळून पानांचा मोठा भाग तपकिरी रंगाचा होतो. या रोगाचा प्रादुर्भाव जस जसा वाढत जाईल त्या प्रमाणात पाने तपकिरी होवून गोळा झालेली दिसू लागतात. त्याच प्रमाणे ओल्या वातावरणात पानाच्या खालच्या बाजूने असलेल्या ठिपक्यावर राखाडी ते पांढर्‍या बुरशीची लागण होते ज्यामुळे  आपल्याला निरोगी भाग व सुकलेल्या भागातील फरक सहज लक्षात येतो. फळावर हा रोग राखाडी हिरवे ते मळकट तपकिरी रंगाच्या आणि सुकलेल्या डागाच्या स्वरुपात दिसतो. या डागाजवळील फळांचा गरहा कडक होतो.

फवारणी / उपाय

                 रोगाची लक्षणे दिसताच मॅनकोझेब २५ ग्रॅम आणि टेब्यूकोनॅझोल ५ मि. लि. या बुरशी नाशकाची प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी. या बुरशीनाशका व्यतिरिक्त मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

पानावरील ठिपके

३ ) पानावरील ठिपके

                  टोमॅटो पिकावर पानावरील ठिपके सेप्टोरिया लायकोपेरसिसा या नावाच्या बुरशीमुळे येतात. या रोगाची लक्षणे खालून वर म्हणजे जुन्या पानांकडून नवीन कोवळ्या पानांपर्यंत पसरतात. या रोगाचे पानांवर बारीक पाणी शोषलेले गडद तपकिरी कडा असलेले राखाडी रंगाचे गोलाकार ठिपके जुन्या पानांनवर खालच्या बाजूला उमटतात. या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यास डाग मोठे होतात व एकमेकात मिसळतात आणि त्यांच्या केंद्रात काळ्या रंगाचे ठिपके दिसू लागतात. खोडावर व फुलांवर याच पद्धतीचे लक्षणे दिसून येतात. जास्त प्रादुर्भाव झालेली पाने फिकट पिवळी होतात आणि वाळून गळतात, पानांची गळ झाल्यामुळे फळे उन्हात करपतात. या रोगाचा प्रादुर्भाव फळांवर फार कमी म्हणजे कधीतरी दिसून येतो.

फवारणी / उपाय

              या रोगाची लक्षणे दिसताच  मॅनकोझेब २५ ग्रॅम किंवा कॉपरऑक्झिक्लोराईड २५ ते ३० ग्रॅम किंवा क्लोरोथॅलोणील २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करवी.

पर्णगुछ किंवा बोकडा ( लिफ कार्ल )

४ ) पर्णगुछ किंवा बोकडा ( लिफ कार्ल )

                            आपण ज्याला बोकडा किंवा पर्णगुछ म्हणतो तो एक विषाणूजन्य रोग आहे.  हा रोग टोबेको लीफकर्ल व्हायरस या विषाणू मुळे होतो. या रोगामुळे पाने वाकडी होतात व झाडाची वाढ खुंटते तसेच पाने पिवळी पडतात. झाड खुजे राहून पर्णगुछासारखे दिसते. त्यामुळे झाडाला फुले व फळे लागत नाही. किंवा लागलेच तर त्यांचा आकार लहान राहतो. या रोगाचा प्रसार हा पांढर्‍या मशीमुळे लवकर होतो.

फवारणी / उपाय

                      या रोगाची लागण पिकाच्या सुरवातीच्या अवस्थे मध्ये जास्त प्रमाणात आढळत असल्या मुळे रोपांवर डायमेथोएट किंवा मिथाईल डिमेटॉन १० मि. लि. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी तसेच रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. तसेच लागवडी नंतर १५ दिवसांच्या अंतराने रसशोषण करणार्‍या किडींसाठी कीटकणाषकाची फवारणी करावी.

फळ सड ( बक आय रॉट )

५ ) फळ सड ( बक आय रॉट )

                    हा रोग फायटोप्थोरा निकोशियाना पॅरासिटिकाफायटोप्थोरा कॅपसीसी या बुरशी मुळे होतो. या बुरशीमुळे बक आय रॉट हा रोग होतो. यारोगामुळे फळावर बदकाच्या डोळ्याच्या आकाराचे तपकिरी रंगाचे वलय दिसतात अशी वलये नंतर सडतात.

फवारणी / उपाय

                  या रोगाची लागण होताच झाडावरील तसेच जमिनीवर पडलेली रोगग्रस्त फळे, पाने गोळाकरून बांधावर किंवा  टोमॅटो प्लॉटच्या शेजारी न टाकता त्यांना जमिनीत गडावीत किंवा जाळून नष्ट करावीत. तसेच मेटॅलॅक्झील एम झेड - ७२ किंवा फोसेटील ए. एल २५ ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

७ ) मर

                मर हा रोग फुजारियम व व्हरटीसेलियम या बुरशीमुळे होतो. फुजारियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे पिवळसर होवून अचानक वाळतात. तसेच व्हरटीसेलियम या बुरशीमुळे रोगग्रस्त झालेली रोपे किंवा झाडे खालून वर पिवळसर होत जातात व गळून पडतात.

फवारणी / उपाय

                  या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम ३ ग्रॅम + मेटॅलॅक्झिल ६ ग्रॅम प्रती किलो बियाणे बिजप्रक्रिया करावी. तसेच लागवडीपूर्वी जमिनीत हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेनखतात मिसळून टाकावे. या रोगाची लक्षणे दिसताच बेनोमिल किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून झाडांच्या मुळा भोवती ओतावे  आळवणी ( ड्रिंचिंग ) करावी.

भुरी ( Powdery Mildew )

८ ) भुरी ( Powdery Mildew )

                 भुरी हा रोग लेव्हेलुला टावरीका या बुरशीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या खालच्या बाजूवर पांढरे चट्टे पडतात आणि त्यांचे प्रमाण वाढल्यास पानांची गळ होते. भुरी या रोगाचा प्रादुर्भाव फांद्या तसेच फळांवर सुधा होतो. यामध्ये सुरवातीला पानाच्या वरच्या बाजूला पिवळसर डाग दिसतात. नंतरच्या काळात  या रोगामध्ये सुरवातीला पांढरी व नंतर राखाडी पिठासारखी पावडर पानांवर तसेच फांद्या व फळांवर पसरून त्यांना झाकून टाकते.

फवारणी / उपाय

                   भुरीच्या नियंत्रणासाठी डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा ट्रायडीमिफॉन किंवा टेब्यूकोनॅझोल ५ टे १० मि. लि. / ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

९ )  टोमॅटो स्पॉटेड विल्ट व्हायरस

                       टोमॅटोवर हारोग विषाणूद्वारे होतो. या रोगामुळे सुरवातीला शेंड्याकडील नवीन पानांवर प्रथम लहान, तांबूस काळसर चट्टे व ठिपके दिसतात. रोगाचे प्रमाण वाढल्यास काही ठराविक दिवसात कोवळी पाने करपून काळी पडतात. रोगामुळे झाड खुरटे राहते व झाडांना फुले व फळे लागत नाहीत. फळे लागलीच तर त्यांची वाढ पूर्ण होत नाही ते लवकर पिकतात रंगात बदल जाणवतो. शेवटी पूर्ण झाड वाळते.

फवारणी / उपाय

                      रोपांची लागवड करत असतांना इमिडाक्लोप्रिड १० मि. लि. किंवा कार्बोसल्फान २० मि. लि. + ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळावी व या द्रावणात रोपांची मुळे १० मिनिटे बुडवून लावावी. हा रोग फुलकिडी मुळे होत असल्याने फुलकीडींचा वेळीच बंदोबस्त करावा.

🙏🙏  शेतकरी बांधवांनो माहिती शेअर जरूर करा 🙏🙏

🌾🌾जय जवान जय किसान🌾🌾

  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

हळद लागवड

 हळद लागवड

शेतकरी बांधवांनो महाराष्ट्र राज्याच्या एकूण हवामानाचा जर विचार केला तर  हळद हे पीक उत्तमरीत्या घेता येते. हळद हे देशातील मसाला पिकात एक प्रमुख व नगदी पीक आहे. निर्यातक्षम व गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी पूर्व मशागती पासून ते हळद प्रक्रियेपर्यंत पिकाचे व्यवस्थापन काळजीपूर्वक करणे गरजेचे असते.


जमीन व व्यवस्थापन

           हळद या पिकाच्या लागवडीसाठी मध्यम प्रतीची तसेच चांगला निचरा होणार्‍या जमिनीची आवश्यकता असते. नदीकाठच्या गाळाच्या जमिनीत तसेच सहा ते साडे सात सामु असलेल्या जमिनीत देखील हे पीक उत्तम येते. हळदीच्या लागवडीसाठी भारी काळी, चिकन, क्षारयुक्त आणि पाण्याचा निचरा न होणारी जमीन निवडू नये. अशा जमिनीत हळदीचे कंद चांगले पोसत नाहीत. व कंद कुजीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर आढळून येतो. सुरूवातीला जमिनीचे माती परीक्षण करून घ्यावे.

हळदीचे खत व्यवस्थापन

                                  हळद हे एक कंद वर्गीय पीक असल्यामुळे हळदीला  जास्तीत जास्त सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्यासाठी एकरी 25 ते 30 बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत वापरावे. जर शेणखत उपलब्ध नसेल तर गांडूळ खत, मळीचे खत इ. सेंद्रिय खतांचा वापर करता येतो. या व्यतिरिक्त रासायनिक खतांचा वापर करत असतांना त्यांचा संतुलित आणि योग्य वेळीच वापर करावा. हळद या पिकासाठी हेक्टरी १०० किलो नत्र ( युरिया ) , १०० किलो स्फुरद (सुपर) आणि १०० किलो पालाश ( पोटॅश ) या प्रमाणात रसायनिक खतांची शिफारस आहे. शिफारशीप्रमाणे संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी दिले असेल. व नत्राचे २ समान हप्त्यात विभागून देण्याची शिफारस आहे. त्यातील पहिला हप्ता हळद लागवडीनंतर ४५ दिवसांनी तर दूसरा हप्ता भरणी करतेवेळी ( लागवडी नंतर १०५ दिवसांनी ) देण्याची शिफारस आहे. हळदीमध्ये भरणी करतेवेळी हेक्टरी २१५ किलो युरिया, २५ किलो फेरस सल्फेट द्यावे. याच बरोबर २ टन निंबोली पेंड द्यावी. भरणी करतांना खते दिल्यामुळे खते योग्यरित्या मातीत मिसळले जातात. ( भरणी करणे म्हणजे सरीमधील माती किंवा लागण केलेल्या दोन्ही गड्ड्यामधील मोकळ्या जागेमधील माती १.५ ते २ इंच शिपीच्या कुदळीने खोदून दोन्ही बाजूच्या गडड्यांना लावणे म्हणजे भरणी होय. )  हळद या पिकाची शाखिय वाढ पूर्ण झाल्यानंतर या पिकास कोणतेही नत्रयुक्त रसायनिक खत जसे युरिया इ. देवू नये. जर युरियासारखी खते दिली तर त्यामुळे हळदीची अतिरिक्त शाखिय वाढ होते. याचा परिणाम हळद पिकाच्या पुढील अवस्थानवर होतो.जसे की हळकुंड भरणे, हळकुंडाची जाडी आणि वजन वाढणे आणि लांबीवर परिणाम पडतो. हळदीमध्ये जर पोटॅशियम युक्त खतांची कमतरता असेल तर त्या ठिकाणी हेक्टरी १२५ किलो पांढरा पोटॅश द्यावा. पोटॅशमुळे हळकुंडाचे वजन वाढून हळकुंडांना चकाकी येते.

हळद पिकाच्या वाढीच्या अवस्था

                             हळद या पिकाच्या वाढीच्या प्रामुख्याने ४ अवस्था आहेत यामध्ये ० ते ४५ दिवस या कालावधीमध्ये  हळद या पिकाची उगवण अवस्था पूर्ण होते. व हळदिस १ किंवा २ पाने येतात. ४६ ते १५० दिवसांमध्ये हळदीची शाखिय वाढ होते. या अवस्थेमध्ये हळदिला फूटवे येतात. तसेच हळदीला एकूण येणार्‍या पानांची संख्या याच अवस्थेमध्ये निश्चित होते. १५१ ते २१० या दिवसांमध्ये फुटव्यांपासून हळकुंडे फुटण्यास सुरुवात होते. २१० ते १७० या दिवसांमध्ये हळकुंडाची जाडी आणि वजन या अवस्थेमध्ये प्रामुख्याने वाढते. या अवस्थांमध्ये पिकाच्या अवस्थेनुसार नत्र, स्फुरद आणि पालाश यांची मात्रा कमी अधिक प्रमाणात लागते.

हळद पिकातील फर्टीगेशन ( ड्रिपद्वारे खत व्यवस्थापन ) 

                                         कुठल्याही पिकाच्या  अधिक उत्पन्नासाठी तसेच रसायनिक खतांच्या वापरावर होणारा अधिक खर्च कमी करण्यासाठी ठिबक सिंचन द्वारे विद्राव्य खते दिल्यास उत्पन्नात वाढ होते.हळद या पिकाचे जास्तीत जास्त उत्पन्न काढण्याच्या दृष्टीने ठिबक सिंचनद्वारे विद्राव्य खतांचा वापर केल्यास पिकाच्या गरजेनुसार खते देता येतात. ( जमिनीचे मातीपरीक्षण करून विद्राव्य खतांचा वापर करावा.) हळद या पिकावर एखादा अन्नघटक जास्त झाला किंवा एखादा अन्नघटक कमी झाला तरी त्याचा परिणाम लगेच पिकाच्या वाढीवर दिसून येतो. उदा. हळदीला जर नत्र हा घटक जास्त झाला तर हळदीची शाखिय वाढ खूप होते. आणि हळद ही काडावरती जाते. त्याचा परिणाम म्हणजे अशावेळी हळदीच्या कंदाची वाढ थांबते. हळदीचे फर्टीगेशन करतांना प्रामुख्याने युरिया, फॉस्फरिक अँसिड आणि पांढर्‍या पोटॅशचा वापर करावा. किंवा मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या १९: १९: १९ , १२: ६१ : ००, ००: ५२: ३४, आणि ००: ००: ५० इ. पाण्यात विरघळणार्‍या विद्राव्य खतांचा पिकवाढीच्या अवस्थेनुसार वापर करावा. हळद या पिकाला ड्रिपद्वारे खाते देण्यास सुरुवात  लागवडीनंतर १५ दिवसांनी करावी.

हळद पिकातील अन्नद्रव्य कमतरतेची लक्षणे

मित्रांनो हळद या पिकावर ज्या प्रमाणे रोगाची लक्षणे दिसतात त्याच प्रमाणे अन्नद्रव्यांची कमतरता झाल्यावर सुधा काही लक्षणे दिसतात ती खालील प्रमाणे

१ ) नत्र :- 

          नत्राच्या कमतरते मुळे हळदीच्या रोपांची वाढ खुंटते, तसेच  खालची जुनी पाने पिवळी पडतात आणि गळतात.

२ ) स्फुरद :- 

                  स्फुरद या अन्नद्रव्याचा हळदीच्या पिकामध्ये मुख्यतः मुळी निर्मितीमध्ये मोलाचा वाटा आहे. स्फुरदाच्या कमतरतेमुळे मुळ्यांची वाढ थांबते. याचा परिणाम जुन्या पानांवर खालच्या बाजूला जांबळ्या छटेच्या स्वरुपात दिसतो.

३ ) पालाश :- 

                 पालाश या अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे हळदीच्या पानाच्या कडा करपतात तसेच टोके सुकतात.

४ ) कॅल्शियम:-

                 हळदीमध्ये प्रामुख्याने कॅल्शियमच्या कमतरतेमुळे शेंड्याकडील पाने पिवळी पडतात व सुरळी वेडी-वाकडी होतात.

५ ) मॅग्नेशियम :- 

                 मॅग्नेशीयम च्या कमतरतेमुळे हळदीच्या पानांच्या शिरांमधील जागा पिवळी पडून पानांच्या शिरा गडद हिरव्या रंगाच्या होतात.

 ६ ) गंधक :- 

                 गंधकाच्या कमतरतेमुळे हळदीमध्ये नवीन पाने पिवळी पडतात. तसेच मुळांची लंबी वाढते. व खोडाची जाडी कमी होते.

 ७ ) लोह :-

                 हळदीमध्ये लोहाचा परिणाम नवीन पानांवर आढळतो. यामध्ये नवीन पानांच्या शिरांमधील भाग पिवळा पडतो. लोहाची कमतरता अधिक झाल्यास संपूर्ण रोप पिवळे पडते.

 ८ ) जस्त :- 

                हळदीची पाने जाड व ठिसुळ बनतात. तसेच हळदीच्या पानांवर सर्वत्र तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. हळदीच्या पानांची झुपक्यामध्ये वाढ होते.

 ९ ) तांबे :- 

                यामध्ये हळदीची पाने कडेने पिवळी पडण्यास सुरुवात होते. आणि पानांची टोके वळतात, व पाने मलूल होऊन वाळून गळतात.

 १० ) बोरॉन :- 

                बोरॉनच्या कमतरतेमुळे रोपाच्या शेंड्याची वाढ थांबते. पाने चाबकसारखी लांबट होतात.

 ११ ) मॉलीब्डेनम :- 

                       हळदीच्या पिकाची जुनी पाने पिवळी पडतात. व पानांवर सर्वत्र तपकिरी रंगाचे ठिपके दिसतात. तसेच पानाच्या खालच्या बाजूने डिंकासारखा स्त्राव येतांना दिसतो. ( पिकामध्ये अन्नद्रव्याची कमतरता झाल्यास किंवा प्रमाण जस्त झाल्यास त्याचे परिणाम पानांवर फळांवर वेगवेगळ्या प्रकारे जाणवते. त्यासाठी योग्य सल्ला घेऊनच अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढावी. )

 हळद पिकावरील कीड व  रोग

                        हळद या पिकामध्ये  प्रामुख्याने कंदमाशी, पाणातील रस शोषन करणार्‍या किडी, पाने खाणार्‍या अळ्या, सूत्रकृमी, हुमणी इ. किडींचा प्रादुर्भाव होतो. यामध्ये कंदमाशी ही सर्वात महत्वाची कीड आहे. या किडिमुळे २५ ते ५० टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. 

 हळदी वरील कीड व  रोग नियंत्रण

कंदमाशी व कुजलेले कंद
कंदमाशी :- 

                 कंदमाशी ही हळदीमधील प्रमुख नुकसान करणारि कीड म्हणून ओळखली जाते. कंदमाशी ही डासासारखी पण आकाराने मोठी व काळसर रंगाची असते. माशीचे पाय हे. तिच्या शरीरापेक्षा लांब असतात. कंदमाशी ही खोडाच्या बुंध्याजवळ किंवा उघड्या पडलेल्या कंदावर अंडी घालते. या अंड्यानमधून ५ ते ७ दिवसात लालसर रंगाच्या नवजात अळ्या बाहेर पडतात. ह्या अळ्या उपजीविकेसाठी कंदामध्ये शिरतात. कंदामध्ये अळ्या शिरल्याणे तेथे रोगकारक बुरशी व सूत्रकृमींचा प्रादुर्भाव सुरू होऊन कंद मऊ होतात, कंदांना पाणी सुटून ते कुजू लागतात. लांबलेल्या पावसाचे वातावरण हे कंदमाशीसाठी अधिक अनुकुल असते. ही कीड ऑक्टोंबर पासून ते पिकाच्या काढनिपर्यंत नुकसान करते. या किडीमुळे हळद पिकामध्ये ४५ ते ५० टक्के नुकसान होते. म्हणून या किडीचा वेळीच बंदोबस्त करावा.

उपाय :-

              कंदमाशीच्या नियंत्रणासाठी उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावे. वेळच्यावेळी हळदीची भरणी करावी. हेक्टरी सहा पसरट भांडे ( मातीचे किंवा प्लास्टिकचे ) वापरुन प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंडीचे २०० ग्राम बी घेऊन त्यात दीड लीटर पाणी मिसळावे. ८ ते १० दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्याने कंदमाश्या आकर्षित होऊन मरू लागतात. कंदमाशी दिसताच ५ टक्के क्वीनॉलफॉस किंवा १० टक्के कार्बारील २० किलो प्रती हेक्टरी धुरळावी व नंतर हलके पाणी द्यावे.

हुमणी व भुंगेरे

हुमणी :- 

              या किडीची आळी देखील नुकसानकारक असते हुमणीचे मादी भुंगेरे हे रोज एक याप्रमाणे अंडी घालतात. व १५ ते २० दिवसांनी आळी बाहेर पडते.अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या काही दिवस सेंद्रिय पदार्थांवर जगतात. नंतर मुळे कुरतडतात. तसेच जास्त प्रादुर्भाव झालेल्या  भागात कंदही कुरतडतात. हुमणीने मुळे कुरतडल्याने हळदीचे पीक पिवळे पडते, रोपे वाळू लागतात तसेच उपटल्यास सहज उपटून येतात. 

उपाय :-

             हुमणी कीडीच्या नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन केल्यास नियंत्रण सुलभ होते. या किडीचे भुंगेरे संध्याकाळच्या वेळेला बाहेर पडतात. ते गोळा करून रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावे. हळद लागवडीनंतर या किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास ४ मी.ली. क्लोरोपायरीफॉस प्रती लीटर पाण्यात घेऊन त्याची आळवणी करावी. ( ड्रिंचिंग करावी ) या किडीच्या  जैवीक नियंत्रणासाठी मेटॅरायझिम अँनसोपली या परोपजीवी बुरशीचा हेक्टरी ५ किलो या प्रमानात कुजलेल्या   शेणखतात मिसळून वापर करावा.

हळदीचे कंद सडणे किंवा गडडे कुजणे :-  

                  ( कंदकुज म्हणजे रायझोम रॉट ) पिथिअम व फायटोपथोरा या बुरशीमुळे होतो. या बुरशीजन्य रोगामुळे हळद पिकाचे ३० ते ३५ टक्के नुकसान होते. या रोगामुळे पाने प्रथम कडेने वळतात, गड्डे मऊ व पाणी सुटल्यासारखे होतात. रोगाची लक्षणे कंदाच्या कोवळ्या फुटव्यांवर लवकर दिसून येतात. नवीन आलेल्या फुटव्यांची पाने ही पिवळसर तपकिरी रंगाची होतात व खोडाचा रंग तपकिरी काळपट होतो. रोगग्रस्त फुटवा ओढल्यास सहज हातामध्ये येतो. जमिनीतील कंद बाहेर काढून पाहील्यास तो पचपचीत ( नासलेला ) व मऊ लागतो त्याला दाबल्यास दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर पडते. या रोगाला कारणीभूत जास्त झालेला पाऊस, भारी काळी कसदार व कमी निचरा होणारी जमीन पोशक असते.

उपाय :-

               हळद लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी जमीन वापरावी. हळद लागवड करत असतांना लागवडीचे कंद हे कार्बेन्डेझिम १५ ग्रॅम + ईकालक्स २० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून त्यामध्ये कंद बुडवून लावावे. हा रोग येऊ नये म्हणून जैवीक बुरशिनाशक ट्रायकोडर्मा प्रती एकरी दोन ते अडीच किलो पावडर २५० ते ३०० किलो चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून जमिनीत पसरावे. रोगाची तीव्रता जास्त असल्यास कॉपर ऑक्सीक्लोराइड ५ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून हळदीच्या बुंध्याभोवती आळवणी करावी. तसेच कार्बेन्डेझिम ( ५० डब्ल्यु . पी. ) १ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब २.५ ग्रॅम प्रती लीटर पाण्यात मिसळून आवश्यकतेनुसार फवारणी करावी. ( पावसाळ्यात शेतामध्ये चारी खोदून पाण्याचा निचरा करावा. तसेच शेतामध्ये पाणी साठू देऊ नये ) 

हळदीमध्ये पानांवरील ठिपके ( करपा / लीफ स्पॉट )

हळदीमध्ये पानांवरील ठिपके ( करपा / लीफ स्पॉट ) :-

                          करपा हा बुरशीजन्य रोग असून या रोगाचा प्रादुर्भाव सकाळी पडणारे धुके व दव असतांना मोठ्या प्रमाणात आढळतो. हा रोग कोलेटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीच्या प्रादुर्भावामुळे होतो. या बुरशीमुळे पानांवर अंडाकृती, लंबगोलाकार तपकिरी रंगाचे ठिपके पडतात. असे पान सूर्याकडे धरून बघितल्यास ठिपक्यांमध्ये अनेक वर्तुळे दिसतात. या रोगाची तीव्रता अधिक वाढल्यास संपूर्ण पान करपते व वाळून गळून पडते. त्यामुळे कंदाची वाढ व्यवस्थित होत नाही.

उपाय :-

                  हळदीच्या पानांवर हा रोग आढळून आल्यास या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब ३०  ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १० ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड ३० ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. वातावरणातील बदलांमुळे जास्त दिवस धुके राहिल्यास १५ दिवसाच्या अंतराने पीक हे ७ महिन्याचे होईपर्यंत बुरशीनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी ( एकाच औषधाचा फवारणीसाठी सतत वापर करू नये ) 

पानावरील ठिपके ( लीफ ब्लॉच ) :- 

                   हा रोग टॅफ्रिना मॅक्युलंन्स या बुरशीमुळे होतो. हा रोग वातावरणातील आर्द्रता वाढल्यामुळे दिसू लागतो. या रोगामध्ये पानावर असंख्य लहान तांबूस रंगाचे गोलाकार ठिपके दिसून येतात पुढे त्या ठिपक्यांमध्ये वाढ होऊन संपूर्ण पान करपते या रोगामध्ये पानाच्या खालील भागावर मुख्य शिरेच्या बाजूने लालसर करड्या रंगाचे १ ते २ सें. मी. व्यासाचे ठिपके दिसतात. त्यामुळे पाने वाळतात या रोगाची सुरुवात जमिनी लगतच्या पानांवर होते व ती नंतर वरील पानांवर पसरते या रोगामुळे हळदीची पाने शेंड्याकडून पिवळी दिसायला लागतात.

उपाय :-

                   या रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डेझिम १० ते २५ ग्रॅम किंवा मॅन्कोझेब  १० ते २५ ग्रॅम किंवा कॉपर ऑक्सीक्लोराइड २५ ग्रॅम प्रती १० लीटर पान्यात मिसळून प्रादुर्भावाचे प्रमाण बघून १०दिवसाच्या अंतराने आलटून पालटून फवारणी करावी. ( रोगग्रस्त पाने वेचून नष्ट करावी. तसेच शेतामध्ये स्वच्छता ठेवावी ) 

सूचना :-  हळदीमध्ये आळवणी करत असतांना ( ड्रिंचिंग ) वाफसा असावा. आळवणी केल्यानंतर पिकाला थोडासा पाण्याचा तान द्यावा. फवारणी करत असतांना औषधांसोबत उच्च प्रतीचे स्टीकर १ मी. ली. प्रती लीटर या प्रमानात अवश्य वापरावे.

🙏🙏  ईतर शेतकरी बांधवांना शेअर जरूर करा 🙏🙏

  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

मिरची लागवड आणि किड व रोग नियंत्रण

 मिरची वरील किड व रोग नियंत्रण

                आज आपण मिरची वरील कीड व रोग याबद्दल जाणून घेवू. शेतकरी मित्रांनो बाजारात हिरव्या मिरचिस वर्षभर मागणी असते. तसेच भारतीय मिरचीला परदेशातूनही चांगली मागणी आहे. मिरचीमध्ये अ ब आणि क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असल्याने मिरचीचा संतुलित आहारात समावेश होतो. तसेच मिरचीमध्ये फॉस्फर, कॅल्शियम आणि खनिज पदार्थ ही आढळतात. म्हणून मिरचीला रोजच्या आहारात महत्वाचे स्थान आहे. मिरचीमधील तिखटपणा व स्वाद या गुणामुळे मिरचीला मसाल्यामध्येही महत्वाचे स्थान आहे. मिरची या पिकाचा औषधी उपयोग सुधा होतो.

मिरची
मिरची

मिरची पिकाची लागवड व हंगाम

                              मिरची या पिकाची लागवड उन्हाळा, हिवाळा, पावसाळा या तीनही हंगामात करता येते. मिरचीला उष्ण व दमट हवामान मानवते मात्र अधिक तापमानात फुले आणि फळे गळतात त्यामुळे अशा वातावरणात जास्त काळजी घ्यावी लागते. मिरचीच्या लागवडी साठी खरीपामध्ये मे महिन्याच्या शेवटी ते जून पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची लागवड जून जुलैत करता येते. रब्बीमध्ये लागवडीसाठी सप्टेंबर ते ऑक्टोंबर पर्यन्त रोपे तयार करून त्या रोपांची पुनर्लागवड ऑक्टोंबर मध्ये करता येते. उन्हाळी हंगाममध्ये नोव्हेंबर ते डिसेंबरमध्ये रोपे तयार करून पुनर्लागवड जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये करता येते 

हवामान व जमीन 

                        मिरची पिकाची लागवड करत असतांना पाण्याचा उत्तम निचरा होणार्‍ या व  मध्यम ते भारी जमिनीत  मिरचीचे पीक चांगले येते. मिरचीचे हलक्या जमिनीत पीक घ्यायचे असल्यास त्यामध्ये योग्य प्रमाणात शेंद्रिय खते वापरल्यास मिरचीचे पीक चांगले येते. ( पाण्याचा योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत मिरचीचे पीक घेऊ नये.) पावसाळ्यात तसेच बागायती मिरचीसाठी मध्यम काळी तसेच पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडावी उन्हाळ्यामध्ये मिरची लागवडीसाठी मध्यम ते भारी जमिनीची निवड करावी. चुनखडी असलेल्या जमिनीतही मिरचीचे पीक चांगले येते.

खत व्यवस्थापन

                         मिरची पिकाला वेळेवर  तसेच नियोजित खते दिल्यास पिकाची वाढ ही जोमदार होते. मिरचीच्या कोरडवाहु पिकासाठी प्रती हेक्टरी ५० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ओलिताच्या पिकासाठी प्रती हेक्टरी १५० नत्र, १२० किलो स्फुरद व १२५ किलो पालाश द्यावे. यापैकी स्फुरद आणि पालाश यांची पूर्ण मात्रा आणि नत्राची अर्धी मात्रा रोप लागवडीच्या वेळी द्यावी. नत्राची राहिलेली अर्धी मात्रा ही रोपांच्या लागवडी नंतर ३० दिवसांनी बांगडी पद्धतीने द्यावी. मिरची लागवडीच्या वेळी भेसळ डोस किंवा मिश्रखते उदा. १०;२६;२६ , १२:३२:१६ , २०:२०:०:१३, डी ए पी. या खतांचा व तसेच  मायक्रोन्यूट्रंट चा वापर करता येतो.

मिरचीवरील कीड

                      मिरची या पिकावर रस शोषण करणारी कीड जास्त प्रमाणात आढळते. त्यापैकि  फुलकिडे, तुडतुडे, पांढरी माशी तसेच कोळी व मावा या प्रमुख किडींचा प्रादुर्भाव आढळतो.

फुलकिडे ( thrips )

१ ) फुलकिडे ( thrips )

                        मिरचीवर फुलकिडे ( थ्रिप्स ) या कीटकांचा प्रादुर्भाव शेंड्यावर किंवा पानाच्या खालच्या बाजूला आढळून येतो. हे कीटक आकाराने अतिशय लहान म्हणजेच १ मीली. पेक्षा कमी लांबीचे असतात त्यांचा रंग हा फिकट पिवळा असतो. हे कीटक पानावर ओरखडे पडतात व त्यामधून निघणारा रस शोषून घेतात. त्यामुळे पाने वाकडी होतात व पानांच्या कडा ह्या वरच्या बाजूला वळतात आणि बारीक होतात. यालाच आपण चुरडा- मुरडा रोग असे म्हणतो. हे कीटक खोडातील देखील रस शोषून घेतात. त्यामुळे खोड कमजोर बनते व पानांची गळ होते.

उपाय : - 

                   या कीडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट ५०० मी. ली. ५०० लिटर पाण्यातून प्रती हेक्टरी फवारावे. किंवा निंबोळीअर्क ४ टक्के फवारावे. ( या किडीच्या चांगल्या नियंत्रणासाठी लागवडी पासून ३ आठवड्यांनी पिकावर १५ दिवसांच्या अंतराने शिफारशीप्रमाणे कीटक नाशकांचा आलटून पालटून वापर करावा. )

तुडतुडे (Jassid)

२ ) तुडतुडे (Jassid)

                      तुडतुडे हि कीड पानातिल रस शोषून घेते तसेच तुडतुडे आणि त्यांची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने राहून त्यातील रस शोषण करतात. या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास पाने मुरगळतात व परिणामी झाडांची वाढ खुंटते

उपाय : -

                मिरचीवरील या किडीच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रिड ४ मी.ली किंवा थायमेथोक्झाईम ४ ग्रॅम किंवा डायमेथोएट १० मी.ली १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( या व्यतिरिक्त मोनोक्रोटोफॉस, सायपरमेथ्रिन, असिटामीप्रिड, निम अर्क याही कीटक नाशकांचा प्रादुर्भावानुसार शिफारशीप्रमाणे वापर करावा. )

पांढरी माशी ( White Fly )

३ ) पांढरी माशी ( White Fly )

               पांढरी माशी हि कीड देखील पानातील रस शोषण करते. या किडीमुळे पाने पिवळी पडतात व करपतात  या किडीच्या प्रादुर्भावाणेदेखील पिकाचे व उत्पन्नाचे  मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. 

उपाय : -

              पांढर्‍या मशीच्या नियंत्रणासाठी मिथील डिमेटॉन १० मी.ली. किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

कोळी ( Mite )

४ ) कोळी ( Mite )

                  हि कीड देखील पानातील रस शोषून घेतात परिणामी पानांच्या कडा  खाली वळतात. तसेच पानांचा देठ लांबतो.

उपाय : -

                 या किडीच्या नियंत्रणासाठी पाण्यात विरघळणारा गंधक ८० टक्के २५ ग्रॅम  किंवा डायकोफॉल २० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ( या व्यतिरिक्त आबामेक्टिन १.९ टक्के (w/w) EC , बायफेणझेट २२.६ टक्के SC या कीटकनाशकांचा शिफारशीप्रमाणे लाल कोळीच्या नियंत्रणासाठी वापर करता येतो . ) 

मावा

५ ) मावा

                हे कीटक मिरचीची कोवळी पाने आणि शेंड्यातील रस शोषण करतात. त्यामुळे नवीन पालवी येणे बंद होते.

उपाय

              मिरची वरील या किडीच्या नियंत्रणासाठी लागवडिनंतर १० दिवसांनी १५ मी.ली मोणोक्रोटोफॉस ३६ टक्के प्रवाही किंवा डायमेथोएट १० मी.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

मिरचीवरील रोग

              मिरची या पिकामध्ये प्रामुख्याने मर, डायबॅक, सरकोस्पोरा पानावरील ठिपके, जिवाणू जन्य पानावरील ठिपके, कोइनोफोरा करपा, भुरी रोग व विषाणू जन्य रोगाचा प्रादुर्भाव होतो. या रोगांपसून पिकाचे संरक्षण करण्यासाठी योग्य उपाय योजना केल्यास प्रभावी नियंत्रण मिळवता येऊ शकते.

१ ) मर

                मर हा रोग जमिनीतील बुरशीमुळे होतो. या रोगाची लागण किंवा प्रादुर्भाव रोपवाटीकेमध्ये बिजलागवडी नंतर दुसर्‍या आठवड्यापासून पाचव्या आठवड्यापर्यंत आढळून येतो. लागण झालेली रोपे निस्तेज आणि कोमेजतात रोपाचा जमिनी लगतचा खोडाचा भाग आणि मुळे सडतात. त्यामुळे रोपे कोलमडतात व मारतात.

उपाय 

                   मिरची बियाणे पेरणीपुर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम १ ग्रॅम किंवा ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम या बुरशी नाशकांची प्रती किलोस बिजप्रक्रिया करावी. तसेच मिरची लागवडीपूर्वी जमिनीत प्रती हेक्टरी ५ किलो  ट्रायकोडर्मा जमिनीत चांगल्या कुजलेल्या शेनखताबरोबर सरीतून मिसळावे. या रोगाच्या नियंत्रणासाठी मिरची लागवडीपासून दुसर्‍या आठवड्यात व तिसर्‍या आठवड्यात १० लीटर पाण्यात ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड ५० टक्के मिसळून या द्रावनाची वाफ्यावर किंवा झाडाच्या बुडाला ड्रिंचिंग (आळवणी ) करावी. 

फळे कुजणे आणि फांद्या वाळणे ( Fruit Rot And Diebeck )

२ ) फळे कुजणे आणि फांद्या वाळणे ( Fruit Rot And Diebeck )

                     हा रोग कोरडवाहु तसेच ओळीतखालील अशा दोन्ही मिरची पिकांमध्ये आढळून येतो. हा रोग कोलिटोट्रीकम कॅपसीसी या बुरशीमुळे होतो. या रोगाचा प्रसार बियाण्याद्वारे तसेच हवेद्वारे होतो. या रोगामुळे फळावर काळपट चट्टे दिसतात. या रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या हिरव्या किंवा लाल मिरचीवर वर्तुळाकार खोलगट डाग दिसतात. दमट हवेत या रोगाचे जंतु वेगाने वाढतात. अशी फळे कुजतात व परिणामी गळून पडतात. या बुरशीमुळे झाडाच्या फांद्या शेंड्याकडून खालच्या दिशेने वाळत येतात. प्रथम कोवळे शेंडे मारतात. नुकसानग्रस्त फांदीची साल प्रथम करड्या रंगाची होऊन फांदीवर घट्ट काळ्या रंगाचे ठिपके आढळतात. पक्व झालेल्या फळांवर गोलाकार किवा अंडाकृती काळे ठिपके आढळतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यास झाडे सुकून वाळतात.

उपाय 

                      या रोगाचा प्रसार बियाण्यापासून होत असल्यामुळे मिरचीच्या रोगमुक्त  बियाण्याचाच वापर करावा. तसेच लागवडीपूर्वी बियाण्याला मॅनकोझेप ३ ग्रॅम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा बेनोमिल २ ग्रॅम किंवा कार्बेन्डेझिम २ ग्रॅम प्रती किलो बियान्यास चोळावे. ( बिजप्रक्रिया करावी ) ( रोपे लावत असतांना बुरशी नाशकाच्या द्रावनात बुडवून लावावे) तसेच हा रोग आढळून आल्यास मॅनकोझेप किंवा कॅप्टन किंवा  कॉपर ऑक्झिक्लोराईड २५ ग्रॅम किंवा बेनोमिल किंवा कार्बेन्डेझिम किंवा प्रोपीकोनॅझोल किंवा डायफेनोकोनॅझोल १० ग्रॅम / १० लीटर पाण्यात मिसळून दर १० दिवसाच्या अंतराने  ३ ते ४ वेळा फावरावे. ( एकाच औषधाचा सतत वापर करू नये ते  आलटून पालटून वापरावे. )

पानावरील ठिपके ( सरकोस्पोरा )

३ ) पानावरील ठिपके ( सरकोस्पोरा )

                      मिरचीवर हा रोग सरकोस्पोरा व अल्टरनेरिया  या बुरशीमुळे होतो. रोगाच्या सुरुवातीच्या काळात पानांवर राखाडी केंद्राचे लालसर तपकिरी कडा असलेले ठिपके उमटतात ते ठिपके कालांतराने दीड सें. मी. पर्यंत मोठे होऊन गव्हाळ्या रंगाची कडा असलेले व मध्य भागी पांढरे केंद्र असलेले होतात. हे ठिपके जास्त संख्येने पानांवर येतात आणि हळूहळू एकमेकांत मिसळून मोठे डाग तयार होतात. या रोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात असल्यास पाने  भरपूर प्रमाणात पिवळी पडून गळतात.

उपाय

                     या रोगाच्या नियंत्रणासाठी मॅनकोझेब किंवा इप्रोडीऑन २५ ग्रॅम किंवा अँँन्ट्राकॉल ३० ग्रॅम किंवा मॅनकोझेब २५ ग्रॅम १० लीटर पाण्यात मिसळून १५ दिवसाच्या अंतराने फवारावे. ( एकाच औषधाचा सतत वापर करू नये ते  आलटून पालटून वापरावे. )

४ ) जिवाणूजन्य पानावरील ठिपके

                     मिरचीवर हा रोग झान्थोमोनस या जिवाणू मुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव ऑगस्ट ते नोव्हेंबर या महिन्यात आढळून येतो. या रोगामुळे पाने, खोड व फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या रोगाच्या सुरवातीला पानावर लाल करड्या रंगाचा ठिपका दिसतो व नंतर तो काळ्या मोठ्या ठिपक्यात रूपांतरित होउन ठिपक्याच्या कडा पिवळ्या होतात. या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असल्यास खोडावरील ठिपके फांद्यावर पसरतात व त्यामुळे खोड व फांद्या वळतात. तसेच नुकसान ग्रस्त पाने पिवळी पडून गळतात.

उपाय

                    मिरची वरील जिवाणूजन्य ठिपक्यांच्या नियंत्रणासाठी १ ग्रॅम स्ट्रेपटोमायसीन + ३० ग्रॅम कॉपर ऑक्झिक्लोराईड १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. पावसाळयामध्ये या रोगाच्या नियंत्रणासाठी जुलै व सप्टेंबर मध्ये दर १५ दिवसांनी याच औषधाचीदोनदा फवारणी करावी.

५ ) विषाणूजन्य रोग

                   मिरची वरील विषाणूजन्य रोगाचा ( तंबाखू मोझाक विषाणू, काकडी मोझाक विषाणू, बटाटा विषाणू आणि पर्णगुछ विषाणू इ. ) प्रादुर्भाव हा बियाण्याद्वारे किंवा फुलकिडे, तुडतुडे व मावा या रसशोषण करणार्‍या किडीमुळे होतो. या रोगामुळे पानाच्या पृष्ठाभागावर हलक्या तसेच गर्द हिरव्या रंगाचे ठिपके आढळतात. परिणामी पाने काठाने गुंडाळतात व झाडाची वाढ खुंटते. पानाचा आकारात बदल होतो. तसेच फुलांची निर्मिती बंद होते.

उपाय

             मिरचीवर या रोगाचा प्रादुर्भाव दिसताच रोगग्रस्त झाडे मुळासकट उपटून टाकावीत व जाळून नष्ट करावीत. जेणेकरून या रोगाचा प्रसार व प्रादुर्भाव  संपूर्ण पिकामध्ये होणार नाही तसेच रस शोषण करणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी गरजेनुसार व शिफारशी प्रमाणे एसिफेट १० ग्रॅम किंवा फिप्रोनिल २० मी. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून मिरचीवर फवारणी करावी. मिरची पिकच्या कडेने दोन - तीन ओळींन मध्ये मक्का लावावी. तसेच पीक तनमुक्त ठेवावे.

भुरी  ( Powdery Mildew )

६ ) भुरी  ( Powdery Mildew )

             भुरी हा रोग लेव्हेलुला टावरिका या बुर्शीमुळे होतो. पानाच्या वरच्या बाजूला वेग वेगळ्या तीव्रतेची व आकाराचे पिवळे ठिपके दिसणे ही या रोगाची सुरवातीची लक्षणे आहेत. पानाच्या खालच्या बाजूला पांढरी पावडर आढळते. या रोगाचे प्रमाण वाढल्यास पानाचा रोगग्रस्त भाग आकसतो व पाने गळतात. खोड आणि फळांना क्वचितच या रोगाची लागण होते.

उपाय

मिरची वर या रोगाची लक्षणे दिसताच डिनोकॅप किंवा ट्रायडेमॉर्फ किंवा कार्बेन्डेझिम १० मि. ली./ग्रॅम किंवा  ट्रायडिमेफॉन किंवा पॅन्कोनाझोल किंवा मायकोबुटानील ५ ते १० ग्रॅम/ मि. ली. प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे. ( लागवड करत असतांना मिरचीचे रोगप्रतिकारक तसेच सुधारित बियाणे वापरावे.)

( विनंती :- शेतकरी बांधवांनो तुमचे प्रश्न किंवा माहिती तुमच्या कडे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये टाईप जरूर करा जेणे करून ईतर शेतकरी बांधवांना त्या महितीचा फायदा होईल. आणि हो हि पोस्ट  शेअर जरूर करा ) 

  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

आले (अद्रक ) पिकातील कीड व रोग व्यवस्थापन

 आले ( अद्रक )

                        या पिकाच्या लागवडीसाठी  मध्यम  प्रतीची, भुसभुशीत कसदार तसेच चांगला निचरा होणारी जमीन ही योग्य असते. नदीकाठची  गाळाची जमीन ही कंद वाढण्याच्या द्रुष्टीने  योग्य असतो. जर हलक्या जमिनीमध्ये आल्याची लागवड करायची असल्यास त्यामध्ये भरपूर शेणखत, कंपोस्ट खत किंवा हिरवळीच्या खतांचा वापर करावा जेणेकरून अद्रकीचे उत्पन्न चांगल्यापैकी येईल. जमिनीची खोली ही कमीत कमी 30 से. मी. असावी

आले ( अद्रक )

आले (अद्रक ) खत व्यवस्थापन 

                                 आले  या पिकास एकूण १६  अन्नद्रव्यांची कमी आधीक प्रमाणात आवश्यकता असते . म्हणून खतांचा वापर करतांना संतुलित व प्रमाणातच खतांचा वापर करावा . आले लागवडीच्या वेळी  जमीन तयार करत असतांना हेक्टरी  १२० किलो नत्र ( युरिया ) , ७५ किलो पालाश ( पोटॅश )  आणि ७५ किलो स्फुरद (सुपर फॉस्फेट ) हे लागवडीच्या वेळी द्यावे. आले पिकाची उगवण पूर्ण झाल्यानंतर साधारणतः १ महिन्याने नत्र ( युरिया ) खताचा निम्मा हप्ता द्यावा. व राहिलेले अर्धे  नत्र हे  २.५ ते  ३ महिन्याने ( उटाळणीच्या वेळी ) द्यावे . त्यावेळी १.५  ते  २ टन  निंबोळी  पेंड द्यावी.

आले  अंतर मशागत 

                             आले लागवडीच्यावेळी तांननाशकांचा वापर केलेला नसल्यास वेळच्या वेळी खुरपणी करावी व तसेच उटाळणी ही पीक  २.५  ते  ३  महिन्याचे असताना करावी. यासाठी लांब दांड्याच्या खुरप्याने माती हलवली जाते.  यामुळे मुळया तुटून त्याठिकाणी नवीन तंतुमय मुळे फुटतात. आल्याच्या पिकास साधारण पाचव्या ते सहाव्या महिन्यात फुले येतात. त्यांना हुरडे बांड असे म्हणतात. उशीरात उशिरा उटाळणी ही हुरडे बांड ( फुले ) येण्यापूर्वी  करावी. हुरडे बांड फुटल्यानंतर या पिकाच्या  पानांची  वाढ थांबून फन्यांची वाढ होण्यास सुरुवात होते. उटाळणी केल्यानंतर पाण्याचा हलका तान द्यावा, म्हणजे फूटवे चांगले फुटतात. ( उटाळणी केली नाही तर उत्पन्नामद्धे १० ते १५ टक्क्यांची घट येऊ शकते )  

आल्यामध्ये अंतर पीक

                    आल्यामध्ये अंतर पीक घेत असतांना अंतर पिकाची मुख्य पिकाशी स्पर्धा होणार नाही याची  खबरदारी घ्यावी . आल्यामध्ये अंतर पीक म्हणून कोथिंबीर, मिरची, झेंडू, तूर, गवार यासारखी पिके घेता येतात.

( उत्पन्नात वाढ होण्यासाठी तसेच तंतूंचे प्रमाण कमी करण्यासाठी नॅप्थील अँसेटीक अँसिड व युरियाचा वापर  ६० आणि  ७५  व्या दिवशी शिफारशीप्रमाणे फवारनीद्वारे करावा. )

आल्यामध्ये कीड नियंत्रण 

कंद माशी

१ ) कंद माशी  :- 

                         आले  या पिकावर कंद मशीचा प्रादुर्भाव आढळतो . ही माशी  काळपट रंगाची असून डासासारखी पण आकाराने मोठी असते . ही माशी  खोडाजवळ अंडी घालते व आळ्या उघड्या गड्ड्यांमध्ये ( कंदामध्ये ) शिरून त्यावर उपजीविका करतात. आळीने कंद पोखरल्यामुळे त्यात बुरशीचा प्रादुर्भाव होतो व नंतर कंद कुजतात ( सडतात ) 

उपाय :-

             कंद माशीच्या नियंत्रणासाठी कंद माशी दिसताच क्विनॉलफॉस ( २५ टक्के  प्रवाही ) २० मि.लि. किंवा १० टक्के  कार्बारील २०  किलो प्रती हेक्टरी धुरळावी किंवा डायमीथोएट १५ मी. ली. प्रती १० लीटर  पाण्यामध्ये मिसळून १५ दिवसाच्या अंतराने  आलटून पालटून  फवारावे. फोरेट  ( १० टक्के दनेदार ) प्रती हेक्टरी  २५ किलो या प्रमाणात झाडाच्या बुंध्याभोवती  पसरावे व पाऊस न पडल्यास लगेच उथळ पाणी द्यावे. ( सडलेले किंवा  अर्धवट कुजके बियाणे लागवडीस वापरू नयेत  )

पाने गुंडाळणारी आळी

२ ) पाने गुंडाळणारी आळी

                           पाने गुंडाळणार्‍या आळीचा रंग हिरवा असून ती अंड्यातून बाहेर पडल्यानंतर स्वतः च्या शरिराभोवती पान गुंडाळून घेते व आत राहून पाने खाते ( पाने गुंडाळणार्‍या आळिच्या  किडींचा  प्रादुर्भाव हा ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून ते नोव्हेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापर्यंत  दिसतो. ) 

उपाय :- 

          आळीने गुंडाळलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. डायक्लोरव्हॉस १० मी. लि. किंवा कार्बारिन ४० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ( प्रादुर्भाव जास्त वाटल्यास अंतरप्रवाही कीटकनाशकांचा वापर करावा )

३ ) खोड पोखरणारी आळी

                                   खोड पोखरणारी आळी ही छोट्या खोडाला छिद्र करून उपजीविका करते. या आळीने छिद्र पाडल्यामुळे खोड पिवळे पडून वाळण्यास सुरुवात होते आळिने पाडलेल्या छिद्रावर जाळीदार भाग दिसतो. (खोड पोखरणारी आळीचा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोंबरमध्ये आढळतो.)  

उपाय :-

               खोड पोखरणार्‍या आळिच्या नियंत्रणासाठी १ महिन्याच्या अंतराने १० मी.ली. मॅलेथीऑन प्रती लीटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारणी करावी. 

आले पिकावरील रोग 

१ ) मुळकुज , कंदकुज ( गड्डे कुज )

                                   आल्यावरील मुळकुज ही फ्यूजारियम पिथियम व रायझोक्टोनिया इत्यादि बुरशीमुळे होते. त्याची लक्षणे ही पाने टोकाकडून बुंध्याकडे वाळत जातात . तसेच सुरूवातीला पानांचे शेंडे वरुण व कडांनी पिवळे पडून खालपर्यंत वाळत जातात.  खांडाचा जमीनिलगतचा भाग काळपट राखाडी रंगाचा पडतो व याठिकांची माती बाजूला करून पहिली असता  गड्डीही काळी पडलेली व निस्तेज झालेली दिसते. हा रोग प्रामुख्याने सूत्रकृमी किंवा खुरपणी , आंतरमशागत करतांना कंदाला इजा झाल्यास, त्यातून बुरशींचा प्रादुर्भाव होतो व कंद कुजण्यास सुरुवात होते.  

उपाय :-

              जमिनीतील पाण्याचा निचरा करावा. तसेच लागवडीसाठी वापरावयाचे कंद हे कर्बेन्डेंझिम १५ ग्रॅम + इकालक्स २० मी.ली. या बुरशींनाशकांचे द्रवण हे  १० लीटर पाण्यात तर करून त्यामध्ये कंद हे २० मिनिटे बुडवून लावावे. लागवडीच्या वेळी रोगमुक्त बियाण्याचाच वापर करावा. शेतामध्ये हा रोग आढळून आल्यास बुरशीनाशकांची  आलटून पालटून फावारणी  करावी.

पानावरील ठिपके तसेच ईतर रोग

२ ) पानावरील ठिपके

                            या रोगाची सुरुवात ही कोवळ्या पानावर होते व नंतर ती सर्व पानावर पसरते पानावर असंख्य गोलाकार ठिपके तयार होतात .

उपाय :- 

              पानावर अशा प्रकारचे ठिपके आढळून आल्यास २५ ते ३० ग्रॅम मॅनकोझेप किंवा १० ते १५ ग्रॅम कर्बेन्डाझिम या बुरशींनाशकांची  प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी ( हवामान परिस्थितीनुसार सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यात १५ ते २० दिवसांच्या अंतराने बुरशींनाशकांची फवारणी घ्यावी )

३ ) सूत्रकृमी

               सूत्रकृमी या मुळातील रस शोषण करतात. त्यामुळे पिकांची वाढ खुंटते व पाने पिवळी पडतात. सूत्रकृमींनी केलेल्या छिद्रातून कंद्कुजीसाठी करणीभूत असणार्‍या बुरशींचा सहज प्रादुर्भाव होतो.

उपाय :-

             सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा + चांगल्या प्रकारे कुजलेले शेणखत मिसळून द्यावे किंवा प्रती हेक्टरी फोरेट ( १० जी ) २५ किलो या प्रमाणात जमिनीमध्ये मिसळून द्यावे किंवा १८ ते २० क्वींटल निंबोळी पेंड जमिनीत मिसळून द्यावी. 

( 🙏 शेतकरी मित्रांना नम्र विनंती जर माहिती आवडल्यास आपल्या ईतर शेतकरी बांधवांना  शेअर करा जेणे करून त्यांनाही या महितीचा उपयोग होईल 🙏 )

Read More
  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

वांग्यातिल मर व करपा रोग आणि उपाय

वांग्यातिल मर व करपा रोग व उपाय

शेतकरी मित्रांनो आपण वांग्यावरील किड व उपाय याबद्दल माहिती पहिली आता आपण वांग्यावर येणार्‍या बुर्शीजन्य व जिवाणू यांच्या मुळे येणारे रोग बघूया 

वांग्यातील मर रोग

मर रोग :- 

                 वांग्यातील मर रोग मित्रांनो वांगे लागवड केल्यानंतर बर्‍याचदा वांग्याचे झाडे मरू लगतात या मागील कारण बर्‍याचदा आपल्याला माहीत नसते त्यामुळे कया करावे हे समजत नाही व पीक वाया जाते. यामागे खलील काही कारणांमुळे पिकाला मर लागू शकते मर हा रोग  फुजॅरियम  सोलणी , रायझोक्टोनिया व व्हर्टिसिलिअम   या   बुरशीमुळे  होतो . फुजॅरियम बुरशीमुळे  पिकातील  पाने पिवळी पडतात . पानावरील शिरांवर खाकी  रंगाचे  डाग दिसतात. झाडाचे  खोड मधून कापल्यास   आतील पेशी काळपट दिसतात . झाडाची वाढ खुंटते आणि  शेवटी  झाड  मरते . रायझोक्टोनिया  या बुरशीमुळे झाड बुंध्याजवळ कुजते . व्हर्टिसिलिअम या  बुरशीमुळे  झाडांची  वाढ खुंटते व झाडास फळे लागत नाही .

उपाय :-

            वांग्यावरील मर रोगाच्या नियंत्रणासाठी प्रथम फेर पालटिची  पिके घ्यावी . जसे की  टोमॅटो , मिरची, वांगी या पिकांनंतर परत वांगी न घेता ज्वारी, बाजरी , मक्का इ. पिके घ्यावीत व दुसर्‍या हंगामामध्ये  वांगी घ्यावीत  उन्हाळ्यामध्ये नांगरट करत असतांना ती खोल करावी. 

१ ) जर पिकावर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला तर या रोगाच्या रसायनिक नियंत्रणासाठी १० लिटर पाण्यात ३० ग्रॅम  कॉपर ऑक्झीक्लोराईड + २० मी . ली. क्लोरोपायरीफॉस मिसळून प्रत्येक झाडाच्या बुंध्याजवळ पंपाचे नोझेल काढून १ ते २ कप याप्रमाणे हे द्रावण सोडावे नंतर पिकाला हलके पाणी द्यावे. 

२ ) लागवडिपूर्वी थायरम किंवा कॅप्टन ३ ग्रॅम किंवा १ ग्रॅम  कार्बेन्डेझिम किंवा ५ ग्रॅम ट्रायकोडर्मा  याची बिजप्रक्रिया करावी 

३ )   लागवडीपूर्वी जमिनीत  प्रती हेक्टरी ५ किलो ट्रायकोडर्मा  शेनखताबरोबर सरीतून जमिनीत मिसळावे 


पर्णगुच्छ  ( बोकड्या  )

२ )    पर्णगुच्छ  ( बोकड्या  ) 

                             मित्रांनो पर्णगुच्छ म्हणजे  ज्याला आपण बोकड्या किंवा झाडे बोकडली असे म्हणतो. हा रोग मायकोप्लाझमा या अतिसूक्ष्म विशानुमुळे होतो. या रोगामुळे झाडांची आणि पानांची वाढ खुंटते झाडाची पाने लहान बोकडल्यासारखी  किंवा पर्णगुच्छासारखी दिसतात. या विशाणूचा प्रसार हा फूलकिडे व तुडतुड्यांद्वारे होतो. 

उपाय :-

१ ) पर्णगुच्छ ( बोकड्या ) या रोगाची प्रथमावस्थेतच रोगट झाडे उपटून ती नष्ट करावीत. रोपांच्या पुनर्लागवडीनंतर ९ ते १० दिवसांनी दानेदार फोरेट हेक्टरी १० किलो प्रमाणे प्रत्येक झाडास खताबरोबर बांगडी पद्धतीने द्यावे. 

२ ) लागवडीपूर्वी गादिवाफ्यावर कार्बोफ्युरान ३५ ते ५० ग्रॅम किंवा फोरेट १० ते २० ग्रॅम प्रती १० चौ मीटर या प्रमाणात मिसळावे 

३) रोगाचा प्रसार करणार्‍या किडींपासून संरक्षणासाठी पिवळ्या आणि निळ्या चिकट ट्रॅपचा वापर करावा 

४ )  इमीडॅक्लोप्रिड १० मि .लि. किंवा कार्बोस्ल्फान २० मी.ली. +  ट्रायकोडर्मा पावडर ५० ग्रॅम प्रती १० लिटर पाण्यात मिसळून त्या द्रवनात रोपांची मुळे ५ ते १० मिनिटे बुडवून लावावीत. 

५ )  लागवडीनंतर १० ते १५ दिवसांनी डायमेथोएट किंवा कुठल्याही साधारण  कीटकनाशकाची  फूलकिडी व तुडतूड्यांसाठी  एक फवारणी घ्यावी. 


पर्णगुच्छ  ( बोकड्या  )

३ )  वांग्यावरील भुरी 

                             भुरी हा रोग इरिसिफी पॉलिगोणी आणि लेव्हेलुला टावरिका या बुरशीमुळे होतो. व पानाच्या दोन्ही बाजूस पांढर्‍या रंगाच्या पिठासारख्या दिसणार्‍या बुरशीची वाढ होते 

 
भुरी 

उपाय :-

               भुरी या रोगाची लक्षणे दिसताच पाण्यात मिसळणारा गंधक २५ ग्रॅम किंवा डिनोकॅप किंवा कर्बेन्डेझिम १० मि. लि. / ग्रेम अथवा ट्रायडिमेफॉन प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारावे.

( टीप :- शेतकरी बांधवांनो वांग्याची लागवड करत अस्तांना रोग प्रतिकारक जातीची निवड करावी जेणे करून पीक रोगाला कमी बळी पडेल व  उत्पन्न वाढेल  )

  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg

वांग्यावरील कीड रोग व उपाय

🍆🍆  वांगे  🍆🍆

मित्रांनो आज आपण वांग्यावरील कीड व रोग याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेवूयात

🍆🍆 वांग्यावरील कीड :-

मित्रांनो सुरवातीच्या कळामध्ये वांग्यावर जो कीडीचा प्रादुर्भाव जाणवतो तो म्हणजे पांढरी माशी , तुडतुडे व मावा यांचा प्रादुर्भाव कसा ओळखावा व काय उपाय योजना करावी ते पाहू

१ ) तुडतुडे :-

तुडतुडे ही कीडी प्रामुख्याने पानाच्या खलील भागावर आढळते, पिले आणि प्रौढ ही पानातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने वाकडी होतात तसेच या किटकान मळे पर्णगूच्छ या विशांनुजन्य रोगाचा देखील प्रसार होतो.


 
                            तुडतुडे

२ ) मावा :-
                मावा ही देखील रस शोषण करणारी किडी आहे, हे कीटक पानातील रस शोषतात त्यामुळे पाने पिवळी पडतात तसेच पाने चिकट होवून ती काळी पडतात.

मावा

नियंत्रण आणि उपाय  :-
                                    तुडतुडे व मावा या रस शोषण करणार्‍या किडीच्या नियंत्रणासाठी  खलील काही बाबी महत्वाचा ठरतात . त्यामध्ये सुरवातीच्या काळात पिकामध्ये पिवळा व निळा चिकट ( स्टिकी पॅड ) ट्रेपचा तसेच ईनसेक्ट नेटचा वापर करावा. या नंतर देखील कीड नियंत्रणात येत नसेल तर रासायनिक कीटकणाशकांचा वापर करावा.

           रसशोषक किडींचे नियंत्रण करत असतांना एकाच कीटकणाशकांचा एका हंगामात जास्तीत जास्त 2 वेळा वापर करावा.

कोणत्याही गटामधील किटकणाशकांचा एका हंगामात ३ पेक्षा जास्त वेळेस वापर करू नये , तसे केल्या किडीमध्ये प्रतिकार शक्ति निर्माण होण्याचा धोका केतेक पटीने वाढतो आणि मग याचा परिणाम म्हणजे किड नियंत्रणा बाहेर जाते.

किटकनाशके निवडतांना ते एका पेक्षा जास्त प्रकारच्या रसशोषक किडींच्या नियंत्रणात उपयोगी ठरेल ह्या नुसारच निवडन्याचा प्रयत्न करावा.

पांढर्‍या मशीचे  प्रौढ किटकणाशकांच्या फवारणीतून लवकर नियंत्रणात येत नाहीत. त्यामुळे या किडीच्या लाहान अवस्थेतच  नियंत्रण करावे जेणे करून प्रादुर्भाव वाढणार नाही.

किड हि पिकाच्या वाढीच्या अवस्तेनुसार हल्ला न करता , तापमान आणि वातावरणातील आद्रता हि किडीस अनुकूल असल्या देखील हल्ला करते हे लक्षात ठेवून फवारणीचे नियोजन करावे. पहिल्या फवारणीसाठी सहज उपलब्ध होणार्‍या काही कीटकणशकांचे ( घटकांची ) नवे व त्यांचा कोणत्या किडींसाठी वापर होतो हे थोडक्यात खाली दिले आहे. 

     किटकनाशकां तील घटक
तुडतुडे मावा फुलकिडे (Thrips) कोळी पांढरी माशी

     1) असिफेट




X

     2) क्लोरपायरीफॉस X X
     3) क्विनालफॉस X
     4) डायमेथोएट
     5) प्रोफेनोफॉस
     6) फॅसोलोन X
     7) मोनोक्रोटोफॉस X

( टीप. दिलेले कीटकणाशके हि  रोगाचा प्रादुर्भाव किती आहे , हे जाणून वापरावे आणी फवारणी साठी १ पेक्षा जास्त कीटकणाशके अकत्रित वापरू नये )

लाल कोळी
३ ) लाल कोळी :-
                       लाल कोळी हे लालसर तांबूस रंगाचे असतात. पिल्ले आणि प्रौढ पानाच्या वर आणि खाली राहून त्यातील रस शोषून घेतात त्यामुळे पाने पांढरट पडतात. पानावर जाळे तयार होते . आणि झाडाची वाढ खुंटते.

उपाय :-
             पिकावर कोळे आढळल्यास पाण्यात मिसळणारे गंधक २५ ग्रॅम , किंवा डायकोफॉल २० मि. लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे.

शेंडे पोखरणारी आळी


शेंडे आणि फळे पोखरणारी आळी :-
                                 शेंडे पोखरणारी आळी प्रथम कोवळ्या शेंड्यात शिरून आतील भाग खाते त्यामुळे शेंडे वळतात. आणि फळे आल्यावर फळे फळे पोखरतात अशी फळे खाण्यास व विक्री करण्यास निरुपयोगी असतात व त्यामुळे उत्पन्नात घाट होते.

उपाय :- 
            १ ) किडग्रस्त शेंडे आणि फळे काढून नष्ट करावी 
२ ) शेंडे आणि फळे पोखरणार्‍या आळीच्या नियंत्रणासाठी ४ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी कींवा सायपरमेथ्रिन ५ मी.लि. कींवा प्रोफेनोफॉस २० मि.लि. १० लीटर पाण्यात मिसळून फवारावे . फळमाशीचे कामगंध सापळे देखील वापरावे .

फळे पोखरणारी आळी

Read More
  •  Facebook
  •  Twitter
  •  Google+
  •  Stumble
  •  Digg
Newer Posts Older Posts Home