बटाटे लागवड
बटाटे लागवड बटाटे लागवड, जमीन , बटाटे बियाणे प्रक्रिया, बटाटे खते व्यवस्थापन, बटाट्यावरील कीड व रोग बटाटा हे कंद वर्गीय प्रमुख भाजीपाला पीक आहे. बटाट्यामध्ये जीवनसत्व ब आणि क भरपूर प्रमाणात असते. त्याच प्रमाणे प्रथिने, चुना फॉस्फरस यासारखी खनिजे भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच आपल्या रोजच्या आहारामध्ये प्रामुख्याने बटाट्याचा सर्रास वापर होतांना दिसतो. बटाट्यामध्ये पिष्टमय पदार्थही भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे बटाटा हे शक्तिवर्धक सुद्धा आहे. बटाटा हे कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारे पीक असून या पिकाला योग्य तसेच नियोजित पद्धतीने लागवड केल्यास कमी कालावधीमध्ये अधिक पैसे मिळवून देणारे पीक ठरू शकते. बटाट्यापासून निरनिराळे खाद्य पदार्थ निर्मिती करता येत असल्यामुळे त्यावरील प्रक्रिया उद्योगांचा अभ्यास करून सुशीक्षित बेरोजगारांनी आपल्या भागामध्ये प्रक्रिया उद्योग उभारल्यास बेरोज गारीची समस्या दूर करता येऊ शकते. जमीन मध्यम ते हलक्या गाळाच्या जमिनीत तसेच कसदार भुसभुशीत व उत्तम निचर्याची जमीन ही बटाट्याचे उत्पन्न घेण्यासाठी तसेच लागवडीस योग्य असते, लागवडीसाठी निवडलेल्या जमिनीचा